Agripedia

देशात गव्हाची लागवड सर्व्यात जास्त केली जाते आणि अनेक गहु उत्पादक शेतकरी यातून चांगली कमाई करतात. गहु एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. देशात सध्या रब्बीचा हंगाम चालू आहे आणि अनेक शेतकरी रब्बी हंगामातील पसात गव्हाची लागवड करण्याच्या विचारात आहेत. तसे बघायला गेले तर रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ही नोव्हेंबर महिन्यातच आपटली जाते. परंतु अनेक भागात गव्हाची लागवड ही डिसेंबर एंडिंग पर्यंत केली जाते.

Updated on 17 December, 2021 10:52 AM IST

देशात गव्हाची लागवड सर्व्यात जास्त केली जाते आणि अनेक गहु उत्पादक शेतकरी यातून चांगली कमाई करतात. गहु एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. देशात सध्या रब्बीचा हंगाम चालू आहे आणि अनेक शेतकरी रब्बी हंगामातील पसात गव्हाची लागवड करण्याच्या विचारात आहेत. तसे बघायला गेले तर रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ही नोव्हेंबर महिन्यातच आपटली जाते. परंतु अनेक भागात गव्हाची लागवड ही डिसेंबर एंडिंग पर्यंत केली जाते.

देशाच्या उत्तर पूर्व भागात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गहु पेरणी करतात याला सर्वसाधारणपणे पसात गहु लागवड म्हणुन संबोधले जाते. जर आपणासही रब्बी हंगामात गव्हाची पसात लागवड करायची असेल तर आज कृषी जागरण आपल्यासाठी काही विशेष सूचना घेऊन हजर झाले आहे. चला तर मग मित्रांनो पसात गहु लागवड करण्याआधी काही महत्वपूर्ण बाबी जाणुन घेऊया. कुठल्याही पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी त्या पिकाच्या उत्कृष्ट जातींची पेरणी करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना कृषी वैज्ञानिक सल्ला देतात कि आपल्या प्रदेशासाठी अनुकूल गव्हाच्या उत्कृष्ट पसात जातीची निवड करावी. एकरी किती बियाणे लागू शकते यासाठी विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा.

पसात गहु लागवडिविषयी महत्वपूर्ण माहिती साधारणतः एक हेक्टर क्षेत्रात पसात गव्हाची लागवड करण्यासाठी 100 किलो बियाणे लागू शकते.शेतकरी मित्रांनो जर आपण फोकून गव्हाची पेरणी केली तर बियाणे जास्त लागते शिवाय तण काढायला अधिक मेहनत घ्यावी लागते.त्यामुळे सीड ड्रिल मशीन द्वारे गव्हाची पेरणी उत्तम ठरू शकते यामुळे उत्पादन वाढते तसेच लागवडीत येणारा खर्च वाचतो.पसात गहु लागवड करायचा असेल तर वावरात हेक्टरी 125 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 ते 60 किलो पालाश गरजेचे असते. थोडी उशिरा पेरणी करत असाल तर पोटॅशचे प्रमाण 80 किलो ठेवावे.

पसात गव्हाच्या पिकातून अधिक उत्पादनासाठी, पेरणीपूर्वी 5 ते 10 टन चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो.वावरातील भात, कापूस, मका या पिकांच्या काढणीनंतर जमिनीतून सल्फर, झिंक, मॅंगनीज आणि बोरॉनची मात्रा कमी होऊन जाते त्यामुळे याची पूर्तता करणे आवश्यक ठरते. त्यामुळे मका, कपाशी आणि भात या पिकांनंतर गव्हाची पेरणी करायची असल्यास आधीच्या पिकांचा कचरा, कडबा, हिरवळीचे खत, शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत टाकावे.जमिनीची सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी शेतात अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्याचा सल्ला दिला जातो. माती परीक्षण करून गहु लागवड केल्यास अधिक उत्पादन प्राप्त होऊ शकते.झिंकची कमतरता असल्यास झिक सल्फेट जमिनीत टाकावे यासाठी कृषी वैज्ञानिक यांचा सल्ला घ्यावा.

English Summary: Rabbi season late wheat cultivation exact date and technique all details
Published on: 17 December 2021, 10:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)