सध्या खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून खरीप हंगामातील पिकांची काढणी आता सुरू आहे. त्यानंतर शेतकरी बंधू रब्बी हंगामाच्या तयारीला लागतील. आपल्याला माहित आहेच की, रब्बी हंगामामध्ये हरभरा आणि गहू तसेच मका या पिकांचे लागवड जास्त प्रमाणात केली जाते.
जर आपण या अनुषंगाने गहू या पिकाचा विचार केला तर गव्हाची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात केली जाते. गव्हाचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे गव्हाला बाजारपेठेत भरपूर मागणी असते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो बोंडअळीची चिंता सोडा, बोंडअळी वर नंदुरबार पॅटर्न यशस्वी; राज्यभर चर्चा
बरेच शेतकरी बंधू गव्हाची लागवड या दिवसांमध्ये करतात. परंतु गहू लागवडीच्या माध्यमातून जर बंपर उत्पादन हवे असेल तर गव्हाच्या योग्य जातींची निवड ही देखील तितकीच महत्वाचे असते. जर आपण गव्हाच्या वाणाचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाच्या जाती आहेत.
परंतु त्या मधून चांगले आणि दर्जेदार जातीची निवड हे खूप आव्हानात्मक काम असते. त्यामुळे आपण या लेखामध्ये गव्हाच्या अशाच एका बंपर उत्पादन आणि शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल, अशा जातीची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न
पुसा तेजस आहे गव्हाची बंपर उत्पादन देणारी जात
गव्हाची ही जात खूप महत्त्वपूर्ण असून या जातीच्या गव्हाचा उपयोग बेकरी उत्पादने तसेच नूडल्स, पास्ता आणि मॅक्रोनी सारख्या उत्पादने बनवण्यासाठी जास्त केला जातो. जर पौष्टिक घटकांचा विचार केला तर या जातीच्या गव्हामध्ये लोह, प्रथिने, विटामिन ए आणि जस्त यासारख्या घटकांचे प्रमाण चांगले असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गव्हावरील जो काही नुकसानदायक रोग आहे तो म्हणजे तांबेरा हा होय. पुसा तेजस ही जात तांबेरा रोगास मध्यम प्रतिरोधक आहे.
या जातीच्या गव्हाच्या पाने रुंद,गुळगुळीत आणि सरळ असतात. ही जात पेरणीपासून 115 ते 125 दिवसांच्या दरम्यान काढणीस येते. या जातीच्या गव्हाच्या 1000 दाण्यांचे वजन 50 ते 60 ग्रॅम असते व या जातीच्या गव्हाची दाणे कडक आणि चमकदार असतात. ही जात अधिक उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध असून शेतकरी बंधूंनी नक्कीच गव्हाची लागवडीसाठी या जातीचा विचार करावा.
Published on: 23 October 2022, 03:27 IST