रब्बी हंगामाची सुरुवात आता झाली आहे. गहू हे रबी हंगामातील सगळ्यात प्रमुख पीक असून गव्हाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. गव्हाच्या शेतीमध्ये प्रगत जातींचा लागवडीसाठी वापर केला तर बंपर उत्पादन मिळू शकते.
या लेखात आपण गव्हाच्या अशा काही जातींची माहिती घेणार आहोत की ज्या जातींची लागवड केल्याने गव्हाचे उत्पादन अडीच ते तीन पट वाढ होऊ शकते.
गव्हाच्या जाती
1-एचआय- 8663 – या जातीची लागवड केल्याने उच्च गुणवत्ता तसेच जास्त उत्पादन मिळेल. ही जात जास्त उष्णतेत टिकाव धरू शकते. ही जात 120 ते 130 दिवसांत काढणीस तयार होते व हेक्टरी 50 ते 55 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा तेजस- गव्हाची ही जात मध्यम भारतासाठी शिफारस केली आहे. अवघ्या तीन ते चार वेळा पाणी दिल्याने सुद्धा ही पक्व होते. या जातीपासून प्रति हेक्टर 55 ते 75 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. या जातीच्या गव्हाचा वापर हा चपाती बनवणे सोबतच पास्ता, नूडल्स सारखे खाद्य पदार्थ बनवण्यात सुद्धा होतो. या जातीमध्ये प्रोटीन, विटामिन ए, आयर्न आणि झिंक सारखे पोषक घटक असतात.
3-पुसा उजाला- पुसा उजाला ही गव्हाची जात ज्या प्रदेशात पाण्याचे सुविधा कमी ऊपलब्ध आहे अशा क्षेत्रासाठी शिफारस केली आहे.
एक ते दोन पाण्याच्या पाळ्या मध्ये हि काढण्यास तयार होते.या जातीपासून प्रति हेक्टरी 30 ते 44 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
4- जेडब्ल्यू- 3336 – या जातीला न्यूट्रीफार्मा योजनेद्वारे विकसित केले गेले आहे. यामध्ये झिंक जास्त प्रमाणात असते तसेच ही जात दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या मध्ये तयार होते. म्हणजे ही जात 110 दिवसांत काढणीस तयार होते तसेच या जातीपासून हेक्टरी 50 ते 60 क्विंटल उत्पादन मिळते.
Published on: 25 October 2021, 09:33 IST