Agripedia

नारायणगाव येथील संतोष भास्करनाना निंबारकर यांनी नुकतीच देशाच्या राजधानीसह पंजाब अणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते नियमित मार्गदर्शन करत असतात. यावेळी दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शनसाठी ते गेले होते.

Updated on 24 April, 2022 9:49 AM IST

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामधील नारायणगाव येथील संतोष भास्करनाना निंबारकर यांनी नुकतीच देशाच्या राजधानीसह पंजाब अणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ते नियमित मार्गदर्शन करत असतात. यावेळी दिल्ली, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शनसाठी ते गेले होते. येथील शेतकऱ्यांना बियाणे, उत्पादन आणि मार्केटिंगबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांच्या शेतीप्रणालीला भरघोस शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्ह्यातून परराज्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करत समस्यांचे निराकरण केले. पीक पद्धतीची पाहणी करून कम्पोस्ट आणि सेंद्रिय खत निर्मिती याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले.

स्थानिक संसाधनाचा वापर करणारी कमी भांडवली खर्चाची मूळ तत्त्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थाचा सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषण विषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्ग पूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच सेंद्रिय शेती होय.

सेंद्रिय शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर गरजेचा आहे. तसेच त्यांनी आपल्या सोबत परिसरातील काही शेतकरी नेले होते. जेणेकरून या शेतकऱ्यांना सुद्धा सेंद्रिय शेतीचे महत्व कळावे. तर परराज्याच्या दौऱ्यानंतर आपल्या राज्यात देखील अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

एक एकरात दहा ते बारा पिकं केली तर जमिनीचे पोषण, किडी पासून बचाव, पिकाचे पोषण, जमिन पुर्णपणे आच्छादित राहिल्याने पाणी बचत होते. विविध पिके असल्याने बाजारात आपल्याही कुटुंबाच्या गरजा भागतात, भावही वेगवेगळा मिळतो, किरकोळ भाजी विकताना अनेक वाण असतात पैसे दुप्पट होतात. मी जे आज सांगितले तेच माझ्या शेतात गेले 23 वर्षे आजमावतोय म्हणूनच माझा परिवार हॉस्पिटल मुक्त असल्याचे निंबारकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
आता गाय पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, जाणून घ्या काय आहे हा नवा नियम
२३ लाखांना खरेदी केला काळा घोडा, घरी आल्यावर धक्काच बसला, वाचा नेमकं काय घडलं
आता शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अल्पदरात भोजन; अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

English Summary: Punjabwari for organic farming guidance of Maharashtra farmers, farmers will benefit ...
Published on: 24 April 2022, 09:49 IST