मानोरा तालुक्यातील ग्राम गव्हा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आयोजित केलेल्या शेती शाळे व्दारे सुधारित कीटकनाशक फवारणी बाबत गावातील शेतकरी व शेतमजूर यांना प्रात्यक्षिका व्दारे मार्गदर्शन करण्यात आले.सदर शेतीशाळा माननीय कृषी अधीक्षक
तोटावर साहेब व उपविभागीय कृषी अधीक्षक ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली The loss was taken under the guidance of Totavar Saheb and Sub Divisional Agriculture Superintendent Thombre Saheb या शेती शाळेमध्ये कीटकनाशक फवारताना काय काळजी घेतली पाहिजे आणि असुरक्षित फवारणीमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी शेतकऱ्यांना तसेच शेतकरी
मजुरांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर येणारी अमावस्या पाहता किडी चा प्रादुर्भाव वाढणार असल्याची पूर्वसूचना देऊन ५ % निंबोळी अर्क फवारणी करण्याचे प्रात्यक्षिका व्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर शेतीशाळेला प्रमुख
मार्गदर्शक म्हणून पोकरा प्रकल्पाचे तांत्रिक समनव्यक ज्ञानेश्वर तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली .सदर शेतीशाळा शेती शाळा प्रशिक्षक शिवाजी वाघ ,श्रीनाथ देशमुख ,सुमित सावले यांनी आयोजित केली होती.
Published on: 27 August 2022, 08:17 IST