Agripedia

सिताफळ बागेचे योग्य मशागतसह खतांचे नियोजन केल्यास सिताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते. सीताफळ या नवीन व जुन्या अशा दोन्ही फूटी वर येतात. म्हणून ही झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात.सीताफळ बागेची योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पन्न मिळते. या लेखात आपण सिताफळ बागेचे वळण व छाटणी व बहारा चे व्यवस्थापन कसे करावे? याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 12 October, 2021 9:58 AM IST

 सिताफळ बागेचे योग्य मशागतसह खतांचे नियोजन केल्यास सिताफळाचे चांगले उत्पादन मिळू शकते. सीताफळ या नवीन व जुन्या अशा दोन्ही फूटी वर येतात. म्हणून ही झाडे नत्राला चांगला प्रतिसाद देतात.सीताफळ बागेची योग्य नियोजन केल्यास चांगले उत्पन्न मिळते. या लेखात आपण सिताफळ बागेचे वळण व छाटणी व बहारा चे व्यवस्थापन कसे करावे? याबद्दल माहिती घेणार आहोत.

सीताफळ बागेची वळण व छाटणी:

  • झाडांना योग्य वळण देण्यासाठी वाढीच्या सुरुवातीच्या काळात हलक्या छाटणीची आवश्यकता असते. झाडांना योग्य वळण देऊन एका बुंध्यावर वाढवली तर झाडे डोलदार वाढतात. नाहीतर अनेक फांद्या असलेले झुडूप तयार होते व वाढ कमी होऊन उत्पादन कमी राहते. एक मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्यांच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्‍यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • सिताफळ लागवडी नंतर रोप चार ते पाच महिन्यात दीड ते दोन फुटाचे झाल्यावर त्याला सहा इंच ठेवून वरील शेंडा कापून टाकावा. बाकीच्या फांद्या काढून घ्यावेत. या फांद्यांना पुन्हा चार ते पाच महिने वाढ द्यावी. परत v आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदीला ठेवून इतर फांद्या काढून टाकावे. म्हणजे जर जून-जुलैमध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि दुसरी छाटणी मे जून महिन्यामध्ये करावी. अशाप्रकारे छाटणी केल्यास दोन वर्षात 16 ते 24 फांद्याचे  उत्कृष्ट झाड तयार होते.
  • यामुळे नवीन व जुनी अशा दोन्ही वाढीवर फळधारणा होते. फळधारणा अवस्थेतील झाडांची मे महिन्यात हलकी छाटणी केल्यास अधिक फळे जाड फांदी वर लागतील.खोल किंवा भारी छाटणी करू नये.छाटणीनंतर लगेच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

सिताफळ बागेचे बहार व्यवस्थापन

  • सिताफळ बागेचे जर उत्तम व्यवस्थापन केले तर दुसऱ्या वर्षी बहार घेता येतो. परंतु व्यापारीदृष्ट्या तीन ते चार वर्षानंतर चांगले उत्पादन मिळते. सिताफळाचे झाड नैसर्गिक रित्या हिवाळ्यात विश्रांतीत जाते. हिवाळा कमी होऊ लागल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पानगळ नैसर्गिकरित्या होऊन नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते.
  • मिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना 35 ते 55 दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची 35 ते 50 टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.
  • या कालावधीत आंतरमशागतीची कामे, छाटणी इत्यादी पूर्ण करून घ्यावी.
  • नवीन फुटलेल्या पालवीसोबत काही प्रमाणात फुले निघतात. मात्र पुरेशी आद्रता नसल्यामुळे गळून पडतात. काही शेतकरी एप्रिल-मे महिन्यात येणारी फुले टिकवण्यासाठी ओलित व्यवस्थापनाद्वारे आद्रता वाढवून बहारघेतात. ही फळे सप्टेंबर महिन्यात तयार होऊन दर चांगला मिळतो. साधारण ताप पाऊस झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढून जून-जुलै महिन्यात बाग फुटते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फळे काढणीस तयार होतात.
English Summary: pruning of casterd apple and spring management
Published on: 12 October 2021, 09:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)