इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे.
संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणे गरजेचे आहे. दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये युरियाचा वापर सर्वाधिक जास्त केला जातो.
अमोनिअम व कॅल्शिअम नायट्रेटचा वापर फक्त २ टक्के शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते, पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते.
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..
पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.
पालाश, कॅल्शिअम, बोरॉन, तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जिवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.
पाकिस्तानमध्ये पेट्राेल २८२ रुपये लीटर, देशात मोठे आर्थिक संकट
युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते, युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात. हे वायू ३०० पटीने कार्बन डायऑक्साइडपेक्षा घातक आहे.
पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या स्तरास छिद्रे पडून, सूर्यापासून तयार झालेली अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते. विना निमकोटेड युरिया वापरल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो.
नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. हिरवळीच्या खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी. एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा.
ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी करा ऑनलाइन अर्ज, 21 एप्रिलपासून सुरुवात
शेतकऱ्यांना दिलासा! आता केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये
ॲपल बोर खाल्याने 65 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाला मोठा आर्थिक फटका..
Published on: 19 April 2023, 12:04 IST