Agripedia

• वेलवर्गीय भाजीपाला पिके :- महाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्या मध्ये प्रामुख्याने काकडी, कारले, घोसाळी, दोडका दुधी भोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व वृद्धांचा ठेवून केली जाते.

Updated on 14 February, 2022 4:14 PM IST
  • वेलवर्गीय भाजीपाला पिके :-

 महाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्या मध्ये प्रामुख्याने काकडी, कारले, घोसाळी, दोडका दुधी भोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व वृद्धांचा ठेवून केली जाते.

लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसानंतर वेलीला वळण देणे.व आधार देणे हे महत्त्वाचे कामे असतात. दर्जेदार व अधिक उत्पादन देण्यासाठी वेलीला मंडप किंवा ताटीने ताटीच्या आधार द्यावा. कारले, दुधी भोपळा, दोडका हे कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके असून,वेलींना चांगला आधार मिळाला तर वेलींना चांगले वाढण्यास मदत होते.

  • मिरची, वांग आणि टोमॅटो यांची लागवड

 मिरची टोमॅटो वांगी या तिन्ही पिकांची रोपे गादी वाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.मिरचीची लागवड करतेवेळी तिचे उत्पादन मार्च - मे महिन्यात बाजारात येईल या दृष्टीने करावे. मिरची मध्ये फुले ज्योती या जातीमधील मिरच्याझुपक्यातयेतात. आणि पानेदेखील दाट असतात.

वांगे या पिकासाठी उंच डेरेदार वाढ असणारा काटेरी देठ, पांढरा, हिरव्या रंगाच्या छटा एकत्र असणाऱ्या चकाकी दार फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. टोमॅटो पिकासाठी वाहन निवडतांना अधिक पानेअसणारा उष्ण तापमानात फलधारणा होणारा, फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.

  • कोथिंबीर :- उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीर चे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. दर आठ दिवसाच्या अंतराने याची लागवड करावी.
  • भेंडी आणि गवार :-

 उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या या भाज्यांना मागणी सुद्धा अधिक असते. भेंडी लागवड करते वेळी हळद्या या रोगास प्रतिकार करणाऱ्या वाणीची निवड करावी. उदा.पूसा, सवानी, परभणी,क्रांती व गवारीसाठी पुसानावबहार या पिकांचे तोडणी संध्याकाळच्या वेळेस करावी.

  • आधारासाठी मंडप आणि ताटी पद्धत:-

वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यास काळे जमिनीपासून चार ते सहा फूट उंचीवर वाढण्यास मदत होते.फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखामिळाल्यामुळे फळांचा रंग एक  सारखा राहण्यास मदत होते.

दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या उत्पन्नापेक्षा अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे फवारणी करणे सोपे होते.

  • राजगिरा, मेथी, माठ यांची लागवड:-

लागवडीसाठी पाण्याचा हमखास, सलग पुरवठा असणे आवश्यक असते. या पिकांच्या विक्रीसाठी बाजारपेठ जवळ असायला हव्यात. तसेच वाहतुकीची सोय उत्तम असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी भांडवलात येणारे हे पीक असते.

English Summary: proper time of cultivatio n ana proper management of this vegetable crop
Published on: 14 February 2022, 04:14 IST