हिंगोलीतील संत नामदेव हळद बाजारात हळदीची आवक सुरु झाली आहे. हिंगोलीतील या बाजारास एक वेगळेच महत्व आहे.परदेशातून देखील या बाजारपेठेत आवक होते. सततच्या बदलत्या वातावरणामुळे पिकांचे मोठ्या प्रणामावर नुकसान झाले आहे. अचानकपणे ढगाळ वातावरण झाल्यामुळे हळदी पिकावर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळून येत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. वसमतच्या बाजारपेठेत देखील आवक घटली असून पीक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. हळदी पिकास सध्या थोडे समाधानकारक दर मिळत आहेत. परंतु शेतकऱ्यांना अधिक दराची अपेक्षा आहे.
हिंगोली हळदीला का आहे जास्त मागणी ?
मराठवाड्याबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून हळदीची आवक हिंगोलीच्या या बाजारपेठेत केली जाते. या बाजारपेठेतील व्यवहार अगदीच चोख असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या बाजारपेठेत जास्त आहे. या बाजारपेठेतील हळदीला सांगली, सातारा भागामधून जास्त मागणी केली जाते. या हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो.
पिकांपेक्षा किडीसाठी वातावरण जास्त पोषक ?
या वेळेस खरीप हंगामासह रब्बी हंगामात देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
पूर्वी फक्त कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतांना दिसून येत होता. आता मात्र ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव हा जवळजवळ सर्वच पिकांवर झाला आहे. या वेळेसचे वातावरण हे पिकांपेक्षा किडीसाठी जास्त पोषक ठरले असे म्हणता येईल. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून उत्पादनात मोठ्या संख्येने घट होतांना दिसून येत आहे.
हळदीला काय आहे दर ?
हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठात जास्त संख्येने हळदीची आवक होत असते. या बाजारातील शेतकऱ्यांना लगेचच पैसे हातात येतात.
त्यामुळे परजिल्हा आणि परराज्यातूनही आवक सुरु असते. यंदा मात्र, करपा आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा अंदाज आहे.मात्र सध्या ९ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.परंतु शेतकऱ्यांना अधिकच्या दराची अपेक्षा आहे. अजून १५ हजार रुपये दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
Published on: 08 March 2022, 10:50 IST