Agripedia

प्राथमिक प्रक्रियेमध्ये काजू प्रक्रिया केंद्र, वाळवणे, पल्प काढणे,भूकटी करणे इ .तसेच बेदाना तयार करणे,

Updated on 10 February, 2022 3:56 PM IST

प्राथमिक प्रक्रियेमध्ये काजू प्रक्रिया केंद्र, वाळवणे, 

पल्प काढणे,भूकटी करणे इ .तसेच बेदाना तयार करणे, नैसर्गिक रंग, सुगंधी तेल इ . सुका भाजीपाला व फळे, ताजी कापलेली फळे व भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यांचे पैकिंग,पल्पींग व कैनींग, हळद प्रक्रिया हळद कूकर इ .घटकांचा विचार होवू शकतो.

उद्देश-

1.फळे, फुले, भाजीपाला, औषधी व सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा व आयुष्य वाढविने.

2. कच्चा माल प्रक्रिया करुन गुणात्मक वाढ/ मुल्य वर्धन करण्या साठी चालना देणी.

माप दंड व अर्थसहाय्याचे स्वरुप- 

अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च- रु.25 लाख.

सर्व साधारण क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु.10 लाख अर्थ साह्य देय आहे.

डोंगराळ व अधिसूचीत क्षेत्रा साठी साठवण क्षमता विचारात घेउन ग्राह्य भांडवली प्रकल्प खर्चाच्या 55 टक्के किंवा कमाल रु.13.75 लाख अर्थ साह्य देय आहे.

अर्थ सहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राह्य धरण्यात येतात.

पात्र लाभार्थी-  

अ. वैयक्तीक लाभार्थी- 

वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सदर अर्थ साह्य हे बँक कर्जाशी निगडित असून (credit linked back ended subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय आहे.

ब. इतर लाभार्थी - 

राज्य सहकारी संस्था, सहकारी, नोंदणीकृत संस्था, विश्वस्त संस्था, फलोत्पादन संघ, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये किमान २५ सदस्य असतील), शेतकरी महिला गट, सार्वजनिक क्षेत्रातील नोंदणीकृत कंपन्या या संस्था/कंपन्यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वतः उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही. मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखा परिक्षण केलेल्या मागिल 3 वर्षाचे पुरावे सादर करावे लागतील.

फिरते प्रक्रिया केन्द्रा मध्ये शेतकरी यांच्या शेतावर जाउन प्रक्रिया करणे अपेक्षित असुन यासाठी लागणारे वाहनाचा खर्च हा अनुदानासाठी ग्राह्य धरला जाइल. मात्र वाहनामध्ये अश्या प्रकारचा बदल केल्याची नोंद R.T.O. कडे असणे आवश्यक आहे. तसेच FSA लाइसेंस च्या धर्तीवर प्रक्रिया केन्द्रात स्वच्छता ठेवणे व तयार होणारे मालाची गुणवत्ता ठेवणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्यालय

English Summary: Primary processing center this scheme comming happyness
Published on: 10 February 2022, 03:56 IST