Agripedia

जगभरामध्ये दरवर्षी सुमारे ६० हजार कोटी रुपये किमतीच्या अन्नधान्याचे नुकसान किडींमुळे होते. त्यामुळे उत्पादकता वाढीप्रमाणे साठवणीच्या तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. साठवणीमध्ये आढळणाऱ्या अधिक नुकसानकारक असलेल्या प्राथमीक किडींची माहिती या लेखात वाचायला मिळेल.

Updated on 15 May, 2021 6:16 PM IST

जगभरामध्ये दरवर्षी सुमारे ६० हजार कोटी रुपये किमतीच्या अन्नधान्याचे नुकसान किडींमुळे होते. त्यामुळे उत्पादकता वाढीप्रमाणे साठवणीच्या तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. साठवणीमध्ये आढळणाऱ्या अधिक नुकसानकारक असलेल्या प्राथमीक किडींची माहिती या लेखात वाचायला मिळेल.

मनुष्याच्या आहारामध्ये धान्याचे प्रमाण हे ८० टक्क्यापर्यंत असते. काढणीनंतर धान्याची साठवण प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाणे याबरोबरच बाजारात अधिक चांगल्या दराच्या अपेक्षेने साठवणूक केली जाते. जगभरात धान्य उत्पादनाच्या १२ % इतके नुकसान शेतामध्ये आलेल्या कीड व रोग मुळे होते. तर कापणी पश्चात साठवणीमध्ये किडींमुळे होणारे नुकसान ३६% आहे. या एकुण ४८% नुकसानीचे विभाजन केले असता २६% कीड व रोग यामुळे, ३३ % तणामुळे, तर १५% धान्याचे नुकसान उंदीर, पक्षी व इतर प्राण्यामुळे होते. किडींचा विचार करता साठवणीच्या काळात प्राथमिक व दुय्यम अशा दोन प्रकारच्या किडीमुळे धान्याचे नुकसान होते. प्राथमिक किडींच्या अळी अवस्थेत दातांची पूर्ण वाढ झालेली असल्यामुळे त्या दाण्यावरील टणक आवरण फोडून धान्याचे नुकसान करू शकतात.

सोंडे भुगेरे :-

पिके : गहू भात मका ज्वारी इ.

या किडीला असलेल्या वैशिष्ट्य पूर्ण सोंडेमुळे तिला सोंडे भुंगेरे हे नाव पडले आहे. सोंडे किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास धान्यातील तापमान वाढते. या किडीची अळी व प्रौढ दोघेही धान्याचे नुकसान करतात. मादी कीटक धान्याच्या दाण्यावर शेता मधेच एक एक अंडे घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी दाणे पोखरून उपजीविका करते. धान्याचे पीठ होते. प्रौढ भुंगेरे दाण्यावर गोलाकार छाप पाडून दाणे फस्त करतात.

खाप्रा भुंगेरा :-

यजमान पिके :  भात, गहू, ज्वारी, मका ,कडधान्य, तेलबिया, तसेच पेंड इ.

या किडीची मादी दाण्यावर तसेच भिंतीवरील भेगांमध्ये अंडी घालत. अळी केसाळ असून ती दाणे पोखरते. परिणामी दाण्याचा टरफले शिल्लक राहतात. अळीच्या अंगावरील केस, शरीरावरील आवरण तसेच विष्ठेमुळे धान्यास दर्प येतो. बाजारमूल्य कमी होते. खाप्रा भुगेऱ्यामुळे होणारे नुकसान गोण्या किंवा पोत्यातील धान्याच्या वरील थरामध्ये आढळते. हिवाळ्यात अन्न नसल्यास किंवा प्रतिकूल हवामानात या किडीच्या अळ्या सुप्तावस्थेत जातात. हि सुप्तावस्था ४ वर्षापर्यंत टिकु शकते.

दाणे पोखरणारी अळी / टोपी  भुंगेरा :-

यजमान पिके : भात मका ज्वारी गहू सातू इ.

नुकसानीचा प्रकार : या किडीची अळी व प्रौढ भुंगेरे धान्याचे नुकसान करतात. मादी भुंगेरे दाण्यावर अंडी घालतात. अळी दाण्यामध्ये शिरून दाणे फस्त करते. त्यामुळे फक्त टरफले राहतात . अळी प्रादुर्भाव ग्रस्त दाण्यामध्ये कोषावस्थेत जाते.

 

तृणधान्यावरील पंतग :-

यजमान पिके : भात मका ज्वारी गहू सातू इ.

नुकसानीचा प्रकार : या किडीची अळी फक्त साठवलेल्या धान्याचे नुकसान करते. हि अळी पांढऱ्या रंगाची असून तिचे डोके पिवळे असते. अळी दाण्यावरील भेगांमधून दाण्यामध्ये प्रवेश करून आतील गाभा खाते. तिचे वास्तव नेहमी दाण्यातच राहून हि कीड शेतामध्ये व साठवणीमध्येही दाण्याचे नुकसान करते. धान्यकोठया किंवा पोत्यामध्ये प्रादुर्भाव होतो.

धान्य साठवणुकीतील होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाचे अरासायनिक किंवा प्रतिबंधात्मक उपाय :  

शेतकरी बंधूंनो  कोट्यावधी रुपयांचे नुकसान केवळ धान्याची व्यवस्थित  साठवणूक न केल्यामुळे होऊ शकते शकते. शेतकरी बंधूंनो आपण धान्य प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाण्यासाठी, इतर गरजा भागविण्यासाठी तसेच बाजारामध्ये चांगली किंमत यावी म्हणून साठवतो.  साठवणुकीतील धान्यामध्ये  किडी, उंदीर,वातावरणातील आद्रता यामुळे दहा टक्के नुकसान होते आणि त्यामुळे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला उपाय योजना करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो आपल्या धान्याचे साठवणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रामुख्याने खालील दोन प्रकारच्या उपाय योजना करता येतात.

  1. नवीन धान्य जुन्या कीड लागलेल्या धान्या जवळ साठवू नका.

  2. धान्याची ची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी साधने उदाहरणार्थ बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, यांच्या मध्ये असलेल्या फटीमध्ये किडींचे वास्तव्य असण्याची शक्यता असते म्हणून धान्य वाहतूक करणाऱ्या साधनाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून करून घ्या व या साधनांमध्ये  असलेल्या किडींचा नाश करा.

  3. धान्य साठवणुकीसाठी वापरले जाणारे पोते कणगे इत्यादीच्या कानाकोपऱ्यात किडी वास्तव्य करतात म्हणून असे साहित्य स्वच्छ किंवा निर्जंतुकीकरण करून घ्या.

  4. मळणी केल्यानंतर धान्य उन्हात वाळून साफ करा व वाळलेले धान्य दातात फोडून बघा व व साठवणूक करण्यापूर्वी या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ टक्क्यांच्या आत राहील याची काळजी घ्या.

  5. सर्वसाधारणपणे धान्य साठवण करण्यापूर्वी दाताखाली असे धान्य चावल्यास कट असा आवाज आला तरच धान्य साठवणीसाठी योग्य हा सर्वसाधारण ठोकताळा आहे.

  6. साठवणूक करण्यापूर्वी धान्यातील ओलाव्याचे प्रमाण आठ टक्क्याच्या आत राहील  याची काळजी घ्या. धान्यातील ओलावा आठ टक्केच्या वर  असल्यास पुन्हा एकदा धान्य उन्हात चांगले वाळवून घ्या. धान्य उन्हात वाळविल्यामुळे ने टणक होते व त्याची गुणवत्ता टिकून राहते.

  7. धान्य साठवणूक पूर्वी धान्याची चाळणी करून घ्या व चाळणी झाल्यानंतर बाहेर पडलेल्या किडी ताबडतोब नष्ट करा.

  8. मोहरी तेल, तीळ तेल, जवस तेल, एरंडेल तेल इत्यादी पैकी कोणत्याही एका खाण्यायोग्य वनस्पती तेलाचा वापर धान्याचे किडीपासून संरक्षण करण्याकरता केला जाऊ शकतो. त्यासाठी धान्य चांगले वाळल्यानंतर तेलाच्या उपलब्धतेनुसार एक क्विंटल कडधान्याला किंवा डाळीला 500 मिली तेल मिसळून चोळावे व असे धान्य पोत्यात मडक्यात किंवा कनगीत साठवावे.

  9. मैदा रवा यासारख्या वस्तूंची साठवणूक करण्याआधी त्या बाजारातून आल्यानंतर त्यांना उष्णता देऊन साठवणूक करावी तसेच धान्य साठवताना कडुलिंबाची पाने राख इत्यादीचा वापर करावा

  • धान्य साठवणुकीत होणारे होणारे नुकसान नुकसान टाळण्यासाठी रासायनिक पद्धतीने करावयाचे किड व्यवस्थापन :

  1. शेतकरी बंधुंनो अत्यंत गरज असेल तर धान्य साठवणूककी पूर्वी रिकामी पोती, साठवणुकीची जागा,रिकामी कणगी तसेच वाहतुकीची साधने फवारणी करून निर्जंतुक करता येतात. ही साधने निर्जंतुक करण्यासाठी Malathion 50 टक्के प्रवाही 10 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता परंतु उघड्या धान्यावर ही फवारणी होणार नाही याची काळजी घ्या तसेच जनावरे लहान मुले यांना यांना कीटकनाशकाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.

  2. मोठ्या प्रमाणात धान्याच्या साठवणुकीसाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड तीन ग्रॅम वजनाच्या दोन ते तीन गोळ्या प्रति टण  कोठारातील धान्यासाठी किंवा दहा ग्रॅम पाऊच प्रति टन बियाण्यासाठी किंवा 150 ग्रॅम पावडर प्रति 100 घनमीटर जागेसाठी साधारणता पाच ते सात दिवस  संपर्कात ठेवल्यास किडींचा नाश होण्यास मदत होते. 

  3. कोणतीही रसायने वापरण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून तज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखालीच रसायनाचा वापर साठवणुकीतील धन्यावरील वरील किडीच्या व्यवस्थापनासाठी करणे केव्हाही हितावह व सुरक्षित असते.

  4. तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन गरज असेल तरच रसायनाचा वापर करावा व शक्यतोवर घरगुती धान्यसाठवण त्यांना प्रतिबंधात्मक व रसायन विरहित बाबीचा अंगीकार करावा.

  5. शेतातील उंदीराचे व्यवस्थापन करताना शिफारशीत झिंक फॉस्फाईड किंवा   Bromodialon  25 % सी. बी. यापैकी कोणत्याही एक रसायन दहा ग्रॅम अधिक 10 मिली गोडेतेल अधिक 380 ग्रॅम भरडलेले गहू, ज्वारी किंवा मका यांचे हे निर्देशीत प्रमाण घेऊन आमिष तयार करावे . नंतर तयार झालेले आमिष साधारण चमचाभर किंवा दहा ग्रॅम प्लास्टिकच्या पिशवीतटाकून शेतातील उंदराच्या जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाच्या जवळ ठेवावे. परंतु ही उपाययोजना करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊनच सुरक्षित रित्या योग्य निदान करूनच वापर करावा. 

  6. धान्याची साठवणूक करताना रसायनाचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर त्यामुळे मानवी शरीरास  इजा किंवा हानी पोचू शकते त्यामुळे शक्यतोवर अरासायनिक प्रतिबंधात्मक कमी खर्चाच्या उपायाचा वापर करून आपले धान्य सुरक्षित ठेवा व धान्याची नासाडी टाळा.

  7. रसायनाचा वापर करण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करू लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करून गरज असेल तरच रसायने वापरावीत.

 

लेखक :-

अमरेश गजानन शेरेकर ,

शेतीशाळा प्रशिक्षक,

(नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,मुंबई)  

उपविभाग : अमरावती. ता. भातकुलीजिं.अमरावती.

English Summary: prevent damage to grain storage
Published on: 15 May 2021, 06:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)