मातील उन्हाचा ताप देणे (Solarisation)
"खात" आणि "ताप" या भारतीय पारंपारिक शेतीतील दोन महत्वाच्या बाबी आहेत.
कोणतेही पीक झालेनंतर जमिनीची खोल नांगरट केली जाते. उन्हात ती नांगरट चांगली तापवली जाते. मातीच्या भौतिक संरचनेनुसार हा नांगरट तापवण्याचा कालावधी ठरतो. काळ्या मातीच्या ठिकाणी नांगरटीने मोठमोठी ढेकळे निघतात. अशा ठिकाणी नांगरट जास्त कालावधीकरीता तापवावी लागते. तर माळाच्या जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीत नांगरटीने ढेकळे न निघता माती मोकळी होते. अशा स्थितीत नांगरट जास्त कालावधीकरीता न तापवता, सरी-वरंबा पद्धतीने ताप द्यावा लागतो (Photo) काळ्या जमिनीच्या ठिकाणीही नांगरट काही कालावधीकरीता तापवल्यानंतर, सरी-वरंबा पद्धतीने जमिनीमध्ये ताप द्यावा लागतो अश्या पद्धतीने सलग दोन किंवा तीन महिने जमिनीला ताप द्यावा.
मातीला उन्हाचा ताप दिल्याचे परिणाम-
१) मातीच्या तापमानात वाढ होते
शेतातील वरच्या ५ सें. मी थरातील मातीचे तापमान ४२℃ ते ५५℃ पर्यंत वाढते तर त्याखालील ४५ सें. मी . पर्यंतच्या मातीचे तापमान ३२ ℃ ते ३७℃ पर्यंत वाढते.
२) मातीच्या भौतिक व रासायनिक वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा होते.
उन्हाचा ताप दिल्यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाचा वेग वाढतो ज्यामुळे विद्राव्य स्वरूपातील, मूलद्रव्ये नायट्रोजन(NO3, NH4+) कॅल्शिअम (Ca++), मॅगनेशियम (Mg++), पोटॅशिअम(K+),फॉलिक ऍसिड इत्यादी पिकांकरीता उपलब्ध होतात. मातीच्या कणांची रचना बदलते.
३) किडींचे नियंत्रण :
जमिनीतील हानिकारक बुरशी, जीवाणू, निमॅटोड, कोषावस्थेतील कीडी इत्यादींचे चांगल्या प्रकारे नियमन होते.
६) पिकांच्या वाढीस गती मिळते :
ज्ञात व अज्ञात किडींचे नियंत्रण झाल्यामुळे. अन्नद्रव्यांच्या विद्राव्य स्थितीत वाढ झाल्यामुळे. जमिनीतील लाभकारी सूक्ष्मजीवांची संख्या वाढल्यामुळेज्या शेतात उन्हाची ताप दिलेली आहे व ज्या शेतात उन्हाचा ताप दिलेली नाही यामध्ये पिकांच्या उत्पादनात तसेच उत्पादन खर्चात खूप तफावत आढळली आहे.
फायद्याच्या शेतीचे ही सूत्रे शेतकरी बंधूंनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. तसेच शेती संबंधित कोणत्याही अडचणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवर फोन करू शकता.
प्रविराम
मोबाईल_नंबर-: 7030338388
Published on: 10 April 2022, 01:53 IST