Agripedia

महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये देखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. कारण शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारची जमीन असावा असं काही नाही.हलक्याे जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्यस आहे.शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेत कमी आहे.परंतु जास्त पावसामध्येशेवगा पिकाचे नुकसान होऊ शकते. या लेखात आपण पावसाळ्यात शेवगा पिकाची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत.

Updated on 31 August, 2021 6:27 PM IST

महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये देखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. कारण शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारची जमीन असावा असं काही नाही.हलक्‍या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्‍य आहे.शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेत कमी आहे.परंतु जास्त पावसामध्येशेवगा पिकाचे नुकसान होऊ शकते. या लेखात आपण पावसाळ्यात शेवगा पिकाची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत.

 अति पावसाचा शेवगा पिकावर होणारा परिणाम

1-शेवगा लागवड करताना पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणे आवश्यक आहे.शेवगा पिकाला कमी पाण्यात असले तरी चालते पण जास्त पाणी नको.

2- शेवगा झाडाची मुळे इतर झाडाच्या तुलनेत अत्यंत नाजूक असून जास्त काळ पाणी मुळाजवळ राहिल्यास मुळे कुजतात. तसेच त्यांच्या अन्नद्रव्ये शोषणाच्या क्षमतेवर परिणाम होतो.

3- पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच ज्या रानात पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून राहते व पाणी बाहेर काढून टाकण्याचाकुठलाही पर्याय उपलब्ध नसतो अशा जमिनी शक्यतो शेवगा लागवड करू नये.

4- सतत जोराचा पाऊस असल्यास किंवा रोज पाऊस पडत राहिल्यास शेवग्याच्या मुळांजवळ बरेच दिवस ओलावा राहतो. अशा अवस्थेत मुळांना बुरशी लागते व मूळकूज होते.

- मुळाना बुरशी लागल्यामुळे पाणी पिवळे पडणे तसेच पानगळ किंवा फुलगळ होणे अशा समस्या निर्माण होतात.

6- मुळकुज जर जास्त प्रमाणात होत असेल तर झाडे सुकून जाऊन मरतात.

7- जास्त पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेवगा शेतकरी मित्रांना तारेवरची कसरत करावी लागते. आज हिरवा दिसणारा शेवगा प्लॉट जास्त पावसामुळे उद्या पिवळा दिसू शकतो.

8-पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घ्यावी. कारण पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातोआणि नंतर फुलधारणा होऊन उत्पादक यांच्या दृष्टीने नियोजन करता येते.

9

 जास्त पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो.तसेच मावा, खोडकिडा,  पाने खाणारी आणि गुंडाळणारी आळी इत्यादी कीटकांचा प्रादुर्भाव होतो.

 पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी?

  • पावसाळ्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतात पाणी साचू देऊ नये. म्हणजेच साचलेले पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
  • पावसाळा चालू होण्याअगोदर बांधावरील लिंबाच्या झाडावर कीटकनाशकांची फवारणी करणे जेणेकरून हुमनी आळी चा पतंगा अवस्थेत बंदोबस्त करता येतो.
  • पतंगा अवस्थेतील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी एकरी किमान दोन प्रकाश सापळे लावावेत.
  • शेवगा झाडाच्या खोडाजवळ इथं काढून टाकावे जेणेकरून खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • खोडाजवळ मातीचा भर द्यावा जेणेकरून झाडे लहान असतील तर वादळी पावसात कोलमडणार नाही.
  • पावसाळा चालू झाल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व ह्युमिक ऍसिड ड्रिप द्वारे द्यावी आळवणी करावी तसेच स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
  • जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये पाण्यासोबत खाली निघून जातात. त्यामुळे मुळांजवळ त्यांची कमतरता जाणवत परिणामी झाडांची वाढ मंदावते व पाने पिवळी पडतात व गळून जातात.
  • अशा अवस्थेत पाऊस काही दिवस संपला तर सूक्ष्म अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य ड्रीप द्वारे द्यावेत.
  • नवीन लागवड असेल तर अशा अवस्थेत झाडे जगण्याकडे कल असावा पाऊस थांबल्यानंतर झाडांची नैसर्गिक वाढ होत असते.
English Summary: precaution of drumstick crop in heavy rain period
Published on: 31 August 2021, 06:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)