कोरडवाहु वाण लागवड करण्यापुर्वी, शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवून घ्यावे. कोरडवाहू परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि कापूस पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.
उगवणीपूर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते. तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव अधिक माहीती
लागवडीपूर्वी
- ऑक्झिफ्लोरफेन गोल गवत उगवणीपुर्वी आणि कापुस ६ इंच उंच होण्याच्या आधी वापरावे. फवारणी केल्यानंतर ३ ते ४ आठवड्यांच्या आत पाऊस होणे फायदेशिर ठरते.
- लागवडीपुर्वी वापरतांना जमिनीत २ इंच खोलवर जाईल याची काळजी घ्यावी.
- पेंडीमेथिलिन टाटा पनिडा, स्टॉम्प लागवडीपुर्वी वापरतांना जमिनीत २ इंच खोलवर जाईल याची काळजी घ्यावी.
- ट्रायफ्युरालिन टिप टॉप, ट्रायफोगन (मक्तेशिम अगान) लागवडीपुर्वी वापरतांना जमिनीत २ इंच खोलवर जाईल याची काळजी घ्यावी. वापर केल्यानंतर १६ महिन्यांपर्यंत मका, ज्वारी, बीट, पालक यासारखी पिके घेवु नये.
- डायुरॉन डायुरेक्स कापुस कमीत कमी ६ इंच इंच असावा.
मनोहर पाटील जळगाव
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 19 June 2021, 04:21 IST