Agripedia

कृषी व कृषक यांना मी सर्वजेष्ठ धन निर्माता समजतो

Updated on 24 April, 2022 8:17 AM IST

कृषी व कृषक यांना मी सर्वजेष्ठ धन निर्माता समजतो असे म्हणणाऱ्या डॉ पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यात काळ्या मातीत राबराब राबून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी लोक वर्गणीतून शाबासकीची थाप देणाऱ्या प्रकाश साबळे या कार्यकर्त्यांची ही गोष्ट.

     दरवर्षी 21 मे रोजी राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार या पुरस्काराचे शेतकरी वाट पाहून असतात. कोणतीही बक्षिसाची मोठी रक्कम नाही किंवा कोणताही भौतिक फायदा नसणाऱ्या या पुरस्कारांची कौतुकाची थाप ही आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असते. खरं म्हणजे प्रकाश साबळे यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांच्यातील तळमळ दिसून येईल. समाजकारण, राजकारण व शेतकऱ्यांशी स्वतः शेतकरी असल्यामुळे असणारी नाळ यामुळे दरवर्षी हा पुरस्कार देण्यामागे त्यांचा मुळातच असलेला समाजसेवेचा पिंड आहे.

2007 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारामागे कमी खर्चाची व बिना कर्जाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा मूळ उद्देश आहे. 2007 मध्ये अगदी छोट्या व प्रामाणिक स्तरावरील कार्यक्रमापासून आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला वाटणारा पुरस्कार अशी या पुरस्काराची ख्याती आहे. जय जवान जय किसान यांच्या सोबतीला जय विज्ञान अशी हाक देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानात भारताला पुढे नेणारे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी 21 मे ला हा पुरस्कार सुरू असतो. गेल्या 16 वर्षापासून आजपर्यंत 1320 प्रस्ताव या पुरस्कारासाठी निवड समितीकडे आले होते त्यामुळे एकूण 222 शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये तूर,आंबा, कापूस, फुल,शेती, संत्रा, भाजीपाला, पेरू, यासोबतच कृषिशास्त्रज्ञ, महिला शेतकरी यांचा समावेश होतो. यातूनच प्रेरणा मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाचे कृषी पुरस्कार मिळालेले आहे. त्यामध्ये नुकताच निता सावदे या अमरावती जिल्ह्यातील महिलेला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे.

राष्ट्रीय स्तर व प्रादेशिक स्तरावरील कृषीतज्ञ व मान्यवरांनी या उपक्रमासाठी प्रकाश साबळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. दरवर्षी 10 मे पर्यंत पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित केले जातात व नंतर गठित केलेली समिती प्रत्येक प्रस्ताव शेतकऱ्यांच्या शेतीला भेट प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात. यामध्ये अमरावती जिल्हा सोयाबीन उत्पादक शेतकरी संघ व 3000 हजार शेतकरी सदस्य असलेल्या संस्‍थेची प्रकाश साबळे यांना मदत होते. ते खुद्द या संस्थेचे अध्यक्ष आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात येते. लोकवर्गणीतून कोणतीही शासकीय मदत न घेता काम करणाऱ्या प्रकाश साबळे यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या श्रमाची कहाणी त्यांची यशकथा पोहोचवायची आहे 70 एकर शेती स्वतः करतात. शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्यांना ते फट्टकल पणे आळशी म्हणतात. तेव्हा स्वतः एकरी 11 क्विंटल सोयाबीन तूर या पिकासोबतम आंतर पीक पद्धतीने घेतल्याने ते सांगतात तेव्हा कुठे तरी आपल्याला त्यांच्या म्हणण्यातील तथ्यता पटते.

खूप मोठ्या पद्धतीने आयोजन काही झगमगाट नाही. प्रसिद्धीची हाव नाही. शेती परवडत नाही, शेती तोट्यात चालली आहे म्हणून सतत हाकाटी होत असते म्हणून नवीन पिढीने नियोजनाने(हातात वही पेन घेऊन शेती केली पाहिजे) असा त्यांचा आग्रह आहे. शेती करणे व शेतकरी/कास्तकार असणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे आपले ठाम मत असल्याचे ही ते आग्रहाने सांगतात. 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण या सूत्रावर विश्वास ठेवणारे प्रकाश साबळे यांना पाहून पंडित नेहरूंचा वाक्यातील I know only one culture that is agriculture ची आठवण येते व राबणाऱ्या शेतकऱ्यांना कौतुकाचे दान वाटणारा हा प्रकाश मला आश्वासक वाटतो.

शेतकऱ्यांचा सन्मान करून पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रकाशदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

शब्दांकन

निखिल रमेश यादव

संस्थापक व अध्यक्ष कृषि शास्त्र समुह

English Summary: 'Prakash', a gift of appreciation to farmers
Published on: 24 April 2022, 08:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)