Agripedia

सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण हे 0.5टक्केच्याखाली चालले आहे.

Updated on 18 February, 2022 4:49 PM IST

सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण हे 0.5टक्केच्याखाली चालले आहे.त्यामुळे जमिनी मधील सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.सेंद्रिय खतांनाकोंबडी खत आहे उत्तम पर्याय आहे.कोंबडी खते वापरल्याने मातीची भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.

कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो.कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडीची जात,वापरण्यात आलेले लिटर चे साहित्य,कोंबडीचे खाद्य,जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असते.या लेखात आपण कोंबडी खताचे फायदे जाणून घेणार आहोत.

कोंबडी खताचे महत्त्व

कोंबडी खतामध्ये तेरा अन्नद्रव्ये असतात.त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं.कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट,यूरिक ॲसिडया प्रमाणात आढळते. मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम,मॅग्नेशियम, सल्फर,सोडियम,बोरन,झिंक,कॉपर, इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

 कोंबडी खताचे चांगले असण्याचे गुणधर्म

1- खाताचा रंग भुरकट,तपकिरी,काळपट असावा.वास मातकट असावा.

3- कणांचा आकार पाच ते दहा मीमी असावा.

4- कर्ब नत्र गुणोत्तर 1:10 ते 1:20दरम्यान असावे.

5- जलधारणशक्ती 30 टक्क्यांपेक्षा जास्त असावी.

 कोंबडी खत वापरण्याची पद्धत

•मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीडमहिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे.यानंतर कुळवाची पाळी द्यावी.

•ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळून नये.

जर उद्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे.म्हणजे त्याचे कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते.त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.

•रुदया पिकात खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.ओलावा नसेल तर पीक पिवळे पडण्याची शक्यता असते.ताजी कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये.

•जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी पाच ते 20 टन खताचा वापर करावा.

English Summary: Poultry manure is the best alternative to organic manure, let us know the benefits of chicken manure crop
Published on: 18 February 2022, 04:49 IST