Agripedia

जमिनीतील मायका, ईलिट, ऑर्थोक्लेस या मिनरल्स मधिल पालाश जीवाणूंच्या व्दारा पिकास उपलब्ध स्वरुपात रुपांतरीत होतो,

Updated on 03 January, 2022 2:27 PM IST

हा पालाश प्रवाहीत करण्याची प्रत्येक जीवाणूची स्वतः ची एक क्षमता आहे, आणि ती क्षमता मातीचा सामु (pH), मातीत असणारी मोकळी हवा म्हणजेच अॅरोबीक (aerobic) परिस्थिती आणि जमिनीत कोणत्या मिनरल्स ची प्रामुख्याने उपस्थिती आहे यावर अवलंबुन असते. परमार आणि सिंधु (२०१३) यांनी केलेल्या अभ्यासानुसार ज्या जमिनीत पालाश चा स्रोत म्हणुन पोरटॅशियम क्लोराईड (MOP) चा वापर केला जातो त्या जमिनीत पोटॅशियम सल्फेट (SOP) वापरलेल्या जमिनीपेक्षा, पालाश प्रवाहीत करणारे जीवाणू हे जास्त प्रमाणात पालाश प्रवाहीत करतात तसेच त्यांना हे देखिल आढळुन आले की, पालाश प्रवाहीत करणारे जीवाणू हे जास्त प्रमाणात सामु (pH) असलेल्या जमिनीत कमी प्रमाणात पालाश प्रवाहीत करतात.

पालाश प्रवाहीत करणाऱ्या जीवाणूंच्या बाबतीत दुसरे एक संशोधन असे सुचित करते की, ८.९ च्या सामु (pH) पर्यंत देखील काही जीवाणू (फ्रॅट्युरिया ऑरिन्टिया) काम करतात. 

बदर (२००६) यांनी बॅसिलस म्युसिलोजिनस ह्या जीवाणू वर संशोधन केले असता त्यांना असे आढळुन आले कि, ह्या जीवाणू ने मायका ह्या मिनरल मधुन प्रती लि. प्रमाणात ४.२९ मिली ग्रॅम ईतका पालाश प्रवाहीत केला, द्रावणाचा सामु हा ८ होता. हा जीवाणू ६.५ ते ८.० ईतक्या सामु पर्यंत काम करतो असे देखिल निदर्शनास आले.

शेंग आणि हि या दोन शास्रज्ञांनी बॅसिलस ईडिफॅकस या जीवाणूवर संशोधन केले असता त्यांना असे आढळुन आले की, हे जीवाणू ईलिट ह्या मिनरल मध्ये असलेला पालाश जास्त प्रमाणात प्रवाहीत करतात, बॅ. ईडिफॅकस फेल्डस्पर च्या मधे असलेला पालाश तुलनेने कमी प्रमाणात प्रवाहीत करतात. शेंग याने केलेल्या बॅसिलस ग्लोबीस्पोरस ह्या जीवाणू वरिल संशोधनात असे आढळुन आले की, हा जीवाणू फेल्डस्पर आणि म्युस्कावाईट पेक्षा बायोटाईट हा मिनरल मधिल पालाश जास्त प्रमाणात प्रवाहीत करतात.

अस हे एकंदरीत गोधंळात टाकणार संशोधन जगभरात सध्या पालाश प्रवाहात करणाऱ्या जीवाणूंबाबत सुरु आहे. ह्या अशा गोंधळाच्या परिस्थितीत एक समान धागा पकडुन त्यानुसार पालाश प्रवाहीत करणारा उत्तम जीवाणू सांगणे हे जरा कठिणच आहे. मात्र आपण असा निष्कर्ष नक्की काढु शकतो की, जमिनीच्या प्रकारानुसार २ किंवा त्यापेक्षा जास्त जीवाणूंचा समुह असलेले उत्पादन शेती करत असतांना पालाश प्रवाहीत करण्यासाठी वापरणे हे कधीही उत्तम ठरेल. असा जीवाणूंचा समुह शास्रिय भाषेत प्रोबायोटिक्स म्हणुन ओळखला जातो. प्रोबायोटिक्स निर्मिती तंत्रज्ञानात एका पेक्षा अधिक मात्र एकाच समुहातील जीवाणू अतिशय जास्त प्रमाणात देता येणे शक्य होते. हे जीवाणू ज्या तंत्रज्ञानाच्या वापराने वाढविले जातात त्या तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचे संतुलित मिश्रण मिळवणे शक्य होते. प्रोबायोटिक्स च्या व्याख्येत जीवाणू समुह आणि जास्त प्रमाणातील त्यांची संख्या ह्या दोन बाबींवर विशेष करुन भर देण्यात आलेला आहे. प्रोबायोटिक्स च्या वापरातुन एकाच प्रकारचे कार्य करु शकणारे, उदा. स्फुरद विरघळवणारे, पालाश प्रवाहित करणारे असे जीवाणू किंवा त्यांचा समूह हा एकत्र करुन दिला जातो. मानवी आणि प्राण्यांच्या साठीच्या आरोग्य उत्पादनात अगदीच अलिकडचे असलेले हे जीवाणू संवर्धन तंत्रज्ञान शेती क्षेत्रात देखिल वापरले जात आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादन करावयाचे झाल्यास असणारी मोठी गुतंवणुक आणि कुशल मनुष्यबळ यांच्या अभावाने, प्रभावी असुन देखिल काही मोजक्या उद्योग संस्थांनीच यात प्रवेश केला आहे.

पालाश प्रवाहीत करणारे जीवाणू त्यांच्या पेशीतुन जे विविध सेंद्रिय आम्ल स्रवतात त्यामुळे जमिनीत असलेला पालाश पिकास उपलब्ध स्वरुपात मिळत असतो. पिकास पालाश सोबतच सिलिका देखील मोफत मिळते हे सत्य नाकारुन चालणार नाही, कारण हा पालाश जमिनीत सिलिका सोबतच जास्त प्रमाणात स्थिर झालेला असतो. हे जीवाणू ज्या वेळेस एकत्रित रित्या भरपुर प्रमाणात सेंद्रिय आम्ल स्रवतात त्यावेळेस त्याच्या आसपासचा परिसर हा आम्ल धर्मिय (acidic - low pH) बनतो, ज्यामुळे त्या परिसरातील पालाश हा पिकास उपलब्ध स्वरुपात रुपांतरीत होतो. ह्या सोबतच हे जीवाणू काही सेंद्रिय चिलेटिंग एजंट देखील स्रवतात ज्यामुळे जमिनीत असलेले ईतर अन्नद्रव्य चिलेटेड स्वरुपात रुपांतरीत होतात, ज्यामुळे देखील पालाश ची उपलब्धता वाढते. पालाश हा एक धन भार असलेला घटक आहे

त्यामुळे ईतर धन भार असलेल्या घटकांशी त्याची पिकाच्या मुळांत शिरण्यासाठी आणि मातीच्या (क्ले) कणांवर चिकटण्याची जी स्पर्धा होते, ती स्पर्धा ह्या अशा प्रकारच्या चिलेशन मुळे कमी होते आणि पिकास पालाशची उपलब्धता वाढते. बॅसिलस म्युसिलॅजिनोसस आणि बॅ. ईडिफॅक्स ह्या दोन जीवाणूंत सेंद्रिय आम्ल स्रवण्यासोबतच धन भार असलेले इतर घटक

 चिलेट करणारे सेंद्रिय चिलेटिंग एजंट स्रवण्याची क्षमता असते. 

पालाश प्रवाहीत करणाक्षऱ्या जीवाणूंच्या वापरातुन उत्पादनात, रासायनिक खतांच्या वापरात, जमिनीवरिल परिणामात काय फरक दिसुन येतो, यावर अनेक ठिकाणी संशोधन झालेले आहे, कापुस, मिरची, केळी, टोमॅटो, भात, ज्वारी, मका, भुईमुग आदी अनेक पिकांवरिल संशोधनातुन पालाश प्रवाहीत करणारे जीवाणू वापरल्याने सकारात्मक असाच परिणाम दिसुन आलेलाआहे.

पालाश हा पिकातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. पालाश एक प्रकारे पिकासाठी असलेली छत्री आहे, जी कडक उन्हात, पाण्याचा ताण असतांना पानांवरिल पर्णरंध्र नियंत्रित करुन पानांतुन होणारे बाष्पीभवन कमी करते. तसेच पालाश पिकाचे स्वेटर देखिल आहे, थंडीच्या काळात पिकाच्या आतील उब कायम राखण्याचे काम देखिल पालाश करते. पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य पालाश करते, ज्या प्रमाणे मानवाच्या शरिरात रोगांशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशी असतात त्याच प्रमाणे पिकाच्या आत असे कार्य करणारे घटक असतात त्यांना अॅलेक्झिन्स किंवा प्लांट बायोटिन्स म्हणुन ओळखले जाते, ह्यांची निर्मिती पिकात नैसर्गिक रित्या होत असते, आणि ह्या निर्मितीसाठी पिकास स्फुरद आणि पालाश यांची गरज भासते. शेतीचा बहुतांश माल हा वजनात विकला जातो, पालाश हे अन्नद्रव्य फळातील गर वाढवून त्याचे वजन वाढविण्याचे कार्य करते.

पालाश प्रवाहीत करणारे जीवाणू हे जमिनीत राहुन पिकास निरंतर परंतु सावकाश रित्या पालाश सतत उपलब्ध करुन देत राहतात. या जीवाणूंचा वापर हा पिक उगवणीनंतर, द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबु आदी पिकाच्या विश्रांतीच्या काळात, फुलोरा अवस्थेत, फळ पक्वता अवस्थेत, तसेच उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात करणे फायदेशीर ठरते. हे जीवाणू वापरत असतांना पिकास पालाश सोबतच मातीत असलेले सिलिका देखील मिळेल हे आता वेगळे सांगणे नकोच,पण पालाश युक्त खतांत देखिल बचत होईल.

English Summary: Pottasium flow microbs thair work
Published on: 03 January 2022, 02:27 IST