Agripedia

सोयाबीन वरिल 'तांबेरा रोगाचा' प्रकोप होण्यासाठी पुढिल वातावरणातली परिस्थिती कारणीभूत असते.

Updated on 07 July, 2022 11:17 AM IST

सोयाबीन वरिल 'तांबेरा रोगाचा' प्रकोप होण्यासाठी पुढिल वातावरणातली परिस्थिती कारणीभूत असते.• लगातार पावसाळी वातावरण असल्याने किंवा • तापमान कमी झाल्यास (22 ते 27 डिग्री सेल्सियस) किंवा • हवेतील अधिक बाष्प ( आर्द्रता 80-90%) इत्यादी • त्याबरोबरच रात्री किंवा पहाटे पावसाळ्यातच धुके (धुवारी) सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास या रोगा ची तीव्रता अती जास्त असते.अशा सर्व कारणामुळे हा रोग पसरण्याची किंवा प्रादुर्भावाची सम्भावना जास्त असते.

आणि *अशी परिस्थिती सद्या बर्याच भागात आहे. करिता वेळीच उपाययोजना आवश्यक आहे. करिता कृपया लेख वाचुन व समजून उपाययोजना करावी.तांबेरा रोगाची लक्षणे- पानांवर सुरूवातीला फिक्कट लालसर व नंतर तेच गर्द लालसर रंगाचे पट्टे पडतात, अशा पट्ट्यांच्या पानांखालिल बाजुवर लालसर रंगाची पावडर जमा होते.भरपुर प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने पांढ-या कागदावर झटकल्यास कागदावर लालसर, पांढरी पावडर जमा झालेली दिसुन येते.या रोगामुळे सोयाबीन पिकाचे ८० टक्यांपर्यंत नुकसान होणे शक्य आहे.

रोग नियंत्रणाची उपाययोजना - 1. रोग प्रतिरोधक जातीची पेरणी करावी. उदा. इंदिरा सोया-9 किंवा फुले कल्याणी ई.2.रबी किंवा उन्हाळी सोयाबीन ची लागवड टाळावी.3.सोयाबीन पिक मळणी नंतर च्या काळात इतर रबी पिक पेरणीच्या वेळेस उगवनार्या सोयाबीन ची रोपे लवकर नष्ट करावी.4.रोगग्रसित रोपांना उपडुन पॉलीथिन मध्ये जमा करून शेता बाहेरील गड्यात गाडुन नष्ट करावे.5. हेक्साकोनाजोल किंवा प्रोपिकोनाजोल (टिल्ट) यापैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाचा 700 मीली प्रति हेक्टरी फवारणी करावी

त्यानंतर प्रादूर्भाव क्षेत्रात पुन्हा 15 दिवसांनी यापैकीच एक बुरशीनाशकाची बदलुन फवारणी करावी.लेख न समजल्यास किंवा संबंधित काही प्रश्न असल्यास आवश्य फोन करावा.'निसर्ग फाऊंडेशन, अमरावती' द्वारा शेतकरी बांधवांच्या हितासाठी लिहीण्यात येणार्या अशा लेखांची वेळोवेळी रचना करून माहिती प्रसारित केली जाते. धन्यवादनिसर्ग फाऊंडेशन चा उद्देश- कृषी खर्च निवारण,कृषकांचे सक्षमीकरन व निसर्गाचे संवर्धन.

 

संकलन- पंकज काळे, निसर्ग फाऊंडेशन, अमरावती

संपर्क क्र.- ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११

English Summary: Potential risk of copper on soybeans (Soyabean Rust)
Published on: 07 July 2022, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)