भारतात आधुनिक शेती कडे लोक वळू लागले आहेत आणि चांगला नफा कमवत आहेत. भाजीपाला लागवड देखील आता आधुनिक पद्धत्तीने केली जात आहे आणि शेतकरी चांगली कमाई देखील करत आहेत. अशाच भाजीपाला पिकांपैकी एक म्हणजे बटाट्याचे पिक. बटाटा हे आपल्याला माहीतच आहे की, जमिनीत उगते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, बटाटा जमिनीत नाही तर आता चक्क हवेत उगवता येणार आहे! तर तुम्ही विश्वास ठेवनार नाही खरंय ना? पण आता बटाटा जमिनीतच नव्हे तर हवेत सुद्धा वाढवता येणे शक्य झाले आहे.
हो खरंच! शेतकरी मित्रांनो ऐरोपॉनिक पद्धत्तीने बटाटा किंवा इतर कोणताही भाजीपाल्याची लागवड केली तर त्याला जमिनीची, मातीची गरज भासत नाही तर ते हवेतच त्याला हवे असणारे पोषकतत्वे शोषून घेते.
ऐरोपोनिक पद्धत्तीने बटाटा लागवड आता भारतात देखील केले जात आहे. ह्या टेक्निकणे जर बटाटा लागवड केली तर जमिनीची बचत होते शिवाय पाण्याची बचत होते तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते तसेच उत्पादन देखील चांगले घेता येते. त्यामुळे ह्या पद्धतीच्या शेतीला Future Farming म्हणजेच भविष्यातली शेती असे म्हणुन देखील संबोधले जात आहे. भारतात एरोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे बटाटे लागवड करण्याचा व वाढवण्याचा प्रयोग हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात करण्यात आला आहे. कर्नाल जिल्यातील बटाटा तंत्रज्ञान केंद्रात ह्या टेक्निकचा यशस्वी वापर करून बटाटा लागवड करण्यात आली आहे. तज्ञांच्या मते, ऐरोपोनिक टेक्निकणे पिकाचे उत्पादन 10 पट वाढू शकते. तसेच सरकारने ह्या टेक्निकला मान्यता दिली आहे तसेच प्रोत्साहन पण देत आहे.
Awesome Gyan नामक वेबसाइटनुसार, एरोपोनिक टेक्निकणे बटाटा लागवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र आणि सेंटर फॉर पोटॅटो टेक्नॉलॉजी कर्नाल यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. यानंतरच, भारत सरकारने या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बटाटे उत्पादन करण्याच्या टेक्निकला मान्यता दिली आहे. या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करण्याची जबाबदारी तसेच प्रचार प्रसार करण्याचे काम फलोत्पादन विभागावर सोपवण्यात आले आहे
ऐरोपॉनिक टेक्निक काम कसे करते
ह्या टेक्निकणे बटाटा तसेच इतर भाजीपाला लागवड केली जाते, ह्या टेक्निकमध्ये लागवड केलेल्या पिकाच्या मूळ्या हवेत लटकलेले असतात आणि हवेतून पोषकतत्वे ग्रहण करतात.
ह्यामुळे ह्याला माती तसेच जमिनीची आवश्यकता नसते. ही टेक्निक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जात आहे. कारण की, ह्या टेक्निकमध्ये पिक लागवडीसाठी लागणारा खर्च कमी आहे आणि शिवाय उत्पादन देखील बम्पर होते. त्यामुळे ह्या टेक्निकणे बटाटा लागवड करून शेतकरी चांगली कमाई करू शकतील असा आशावाद आता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
Published on: 16 October 2021, 08:18 IST