हुमणी अळी अनेक शेतकऱ्यांची डोके दुःखी वाढवत आहे. आता पावसाअभावी पुणे जिल्ह्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात उसावर हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य पावले उचलण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यात उसाचे सरासरी एक लाख १७ हजार ७१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ४३ हजार ४५२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर आडसाली, सुरू आणि खोडवा ऊस उभा असतो. कमी पाऊस झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत हुमणी अळी डोके वर काढत असते.
दूध दर आंदोलन पेटले! सांगोल्यात रास्ता रोको, शेतकरी अडचणीत..
कृषी विभागाने पुढील एक ते दीड महिन्यात तब्बल ८ हजार ८४० प्रकाश सापळे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याबाबतच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे उसाचे हुमणीपासून मोठे नुकसान टाळता येणार आहे.
1 जुलैपासून शेतकरी जनजागृती अभियान, राजू शेट्टी करणार रायगडावर मोठी घोषणा
शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील गावागावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र हुमणीखाली येते. या तालुक्यात उसाचे मोठे क्षेत्र देखील आहे.
आता वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
दुग्धव्यवसायाला मिळते गती, हे यंत्र अनेकांची कामे मिनिटांत करते, जाणून घ्या...
कारखानदारांनो एफआरपी कधी देणार? पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८९ कोटींची एफआरपी थकित
Published on: 26 June 2023, 10:53 IST