Agripedia

Pomegranate Farming: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) मात्र असे जरी असले तरीदेखील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न (Farmers Income) सर्वांचीच काळजी वाढवणारे आहे. भारत नावाला शेतीप्रधान देश आहे असे मत देखील आता शेतकरी (Farmer) व्यक्त करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधवांची शेतीवर आता अनास्था होऊ लागली आहे. मात्र कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात जर बदल केला तर निश्चितच शेती देखील एक फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

Updated on 01 July, 2022 2:11 PM IST

Pomegranate Farming: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) मात्र असे जरी असले तरीदेखील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न (Farmers Income) सर्वांचीच काळजी वाढवणारे आहे. भारत नावाला शेतीप्रधान देश आहे असे मत देखील आता शेतकरी (Farmer) व्यक्त करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधवांची शेतीवर आता अनास्था होऊ लागली आहे.

मात्र कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात जर बदल केला तर निश्चितच शेती देखील एक फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देत आता आधुनिकतेची सांगड घालत फळबाग लागवड तसेच नगदी पिकांची शेती करणे अतिशय महत्त्वाचे बनले आहे. विशेष म्हणजे यासाठी मायबाप शासन देखील प्रयत्न करीत आहे. यासाठी मायबाप शासन दरबारी अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या जात आहेत.

मित्रांनो शेतकरी बांधवांनी शेतीतुन अधिकचे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी फळबाग लागवड करावी असा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण डाळिंब शेती (Pomegranate Cultivation) विषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो खरे पाहता डाळिंब लागवड भारतातील अनेक राज्यात बघायला मिळते. मित्र जरी असले तरी देखील महाराष्ट्रात डाळिंब लागवड विशेष उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती बघायला मिळते.

नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव देवळा हा भाग देखील डाळिंब शेती साठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. आपल्या राज्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिलनाडु आणि गुजरात या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती बघायला मिळते. मित्रांनो डाळिंब रोपे लागवड केल्यानंतर मोजून दोन वर्षांनी उत्पादन देण्यास तयार होत असतात, मात्र असे असले तरी कृषी तज्ञ शेतकरी बांधवांना डाळिंब रोपे लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी उत्पादन घ्यावे असा सल्ला देत असतात. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की एकदा डाळिंब रोपे लागवड केल्यानंतर सलग चोवीस वर्षे त्यापासून उत्पादन घेता येणे शक्‍य आहे. यामुळे डाळिंब शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरणारी आहे.

रोपे लावण्यासाठी हा काळ सर्वात योग्य आहे

डाळिंबाची लागवड रोपांच्या स्वरूपात केली जाते. डाळिंब रोपे लावण्यासाठी पावसाळ्याचा हंगाम हा सर्वात योग्य असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत असतात. सभोवतालचे तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असताना शेतात डाळिंबाची पेरणी करावी. जर शेतकरी डाळिंबाची लागवड करत असतील, तर रोप लावण्यापूर्वी सुमारे 1 महिना आधी खड्डा खणून घ्या.

केव्हा सिंचन करावे

डाळिंबाच्या झाडांना जास्त सिंचन लागते. पावसाळ्यात त्याचे पहिले पाणी 3 ते 5 दिवसांत द्यावे लागते. पावसाळा संपल्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. त्याच्या झाडांच्या सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा वापर वाढीसाठी सर्वात प्रभावी मानला जातो.

इतका नफा

डाळिंबाच्या लागवडीत एका झाडापासून 80 किलो फळे मिळू शकतात. एका हेक्टरमध्ये सुमारे 4800 क्विंटल फळांची काढणी करता येते. तज्ज्ञांच्या मते, एका हेक्टरमध्ये डाळिंबाची लागवड करून तुम्ही आठ ते 10 लाख रुपयांपर्यंत सहज उत्पन्न मिळवू शकता.

English Summary: pomegranate farming makes farmer rich
Published on: 01 July 2022, 02:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)