Agripedia

राज्यात फळबाग पिकांपैकी सर्वात महत्त्वाचे फळ पीक आहे डाळिंब. राज्यातील अनेक भागात डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले जाते. द्राक्षासाठी जगप्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा नजरेस पडतात. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंबातून अल्प कालावधीत अधिक उत्पन्न प्राप्त होते, शिवाय डाळिंबाला मोठी मागणी असल्याने याच्या विक्रीसाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठी पायपीट करण्याची आवश्यकता नसते. डाळिंब मध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने याची मागणी बारामाही असल्याचे सांगितले जाते.

Updated on 12 February, 2022 6:24 PM IST

डाळिंब शेतीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची लागवड कुठल्याही जमिनीत सहजरीत्या करता येते व त्यातून यशस्वी उत्पादन देखील घेता येते. डाळिंबाच्या लागवडीसाठी भारीच जमीन हवी असे काही नाही. डाळिंब शेती साठी अल्पसा खर्च करून मुबलक असे उत्पादन प्राप्त करता येऊ शकते. डाळिंबाचा बहार पकडण्यासाठी थोडा अधिक खर्च करावा लागतो मात्र त्यानंतर डाळिंब शेतीत द्राक्ष प्रमाणे खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. शेती क्षेत्रात होत असलेल्या अमुलाग्र बदलाप्रमाणे डाळिंब शेतीत देखील मोठा बदल होत आहेत यामध्ये आता यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पण सर्व गोष्टी डाळिंब शेती साठी अनुकूल असताना देखील लागवडी दरम्यान डाळिंब पिकावर विशेष लक्ष ठेवणे अनिवार्य आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात डाळींबाची यशस्वी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र डाळिंबाच्या उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. डाळिंबाची झाडे लावल्यानंतर दोन वर्षानंतर अनेक डाळिंब उत्पादक शेतकरी त्यापासून उत्पादन काढतात मात्र कृषी तज्ञांच्या मते धाड चार वर्षाचे झाल्यावर डाळिंबाचे उत्पादन घेणे सुरू करावे. डाळिंबाचे उत्पादन येण्यास सुरू झाल्यापासून 25 वर्षापर्यंत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.

डाळिंब शेतीतील काही महत्त्वाच्या बाबी

डाळिंब हे एक प्रमुख फळपीक आहे, याचे झाड उपोष्ण कटिबंधीय हवामानात चांगल्या पद्धतीने वाढते व अशा हवामानात लागवड केल्यास दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. डाळिंबाला फळधारणा होण्यासाठी तसेच फळांची चांगली वाढ होण्यासाठी उष्ण समवेतच कोरडे हवामान आवश्यक असल्याचे तज्ञद्वारेच सांगितले गेले आहे. डाळिंब लागवड भारी ते हलक्या अशा कुठल्याही जमिनीत केले जाऊ शकते मात्र पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. डाळिंबाची लागवड पडीत जमिनीत केली जाते मात्र यासाठी नैसर्गिक खतांचा वापर करणे गरजेचे असणार आहे. 

डाळिंबाची कुठली एक प्रगत वाण निवडून शेतकरी बांधवांनी लागवड करणे गरजेचे आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यात विशेषता कळवण सटाणा मालेगाव देवळा या भागात मोठ्या प्रमाणात भगवा या डाळिंबाच्या जातीची लागवड केली जाते. राज्यात गणेश जातीची डाळिंब लागवड देखील मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबाच्या सुधारित जातीची लागवड करण्याचाच सल्ला कृषी वैज्ञानिक देतात.

English Summary: pomegranate farming is very benificial for farmers but
Published on: 12 February 2022, 06:24 IST