Agripedia

पॉलीसल्फेट हे आयसीएल(ICL) द्वारे युकेमध्ये बनविण्यात आलेले बहु-पोषक नैसर्गिक खत आहे. हे एक नैसर्गिक खनिज (डायहाइड्रेट पॉलिहालाईट) आहे. ज्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक, पोटॅशिअम, सल्फर, कॅल्शिअम आण मॅग्नेशिअम आहेत.

Updated on 07 May, 2021 11:31 AM IST

पॉलीसल्फेट हे आयसीएल(ICL) द्वारे युकेमध्ये बनविण्यात आलेले बहु-पोषक नैसर्गिक खत आहे. हे एक नैसर्गिक खनिज (डायहाइड्रेट पॉलिहालाईट) आहे. ज्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक, पोटॅशिअम, सल्फर, कॅल्शिअम आण मॅग्नेशिअम आहेत. 

हे एक नैसर्गिक क्रिस्टल असल्याने पाण्यात हळूहळू विरघळते आणि मातीत आपले पोषक तत्व हळू-हळू सोडत असते. पॉलीसल्फेटची ही विशेषता आहे की, पीक चक्राच्या दरम्यान पोषक उपलब्धता दीर्घकाळासाठी राहत असते. तर इतर पारंपारिक पोटॅश, आणि सल्फेट खतांमधील पोषक द्रव्ये पिकांच्या थोड्याच काळासाठी उपलब्ध असतात. पॉलीसल्फेट (पॉलीहॅलाइट) द्वारे तत्वाचं दीर्घ रिलीज पॅटर्न जास्त पाऊस झाल्यानंतरही गळतीमुळे होणारे पोषक तत्वांचे नुकसान खूप कमी करत असते. पॉलीसल्फेटचे हे वैशिष्टये हे आहे की, शेतीच्या सर्व परिस्थितीमध्ये हे सर्वात उपयुक्त खत बनवतं.

हेही वाचा :माझं मत ‘माती परीक्षण काळाची गरज’..

Nutrient composition
K2O 13.5%
S 18.5%
MgO 5.5%
CaO 16.5%

पॉलीसल्फेट सर्व पिकांसाठी आहे उपयुक्त:

शेतकऱ्यांसाठी हे कमी उत्पादन खर्चात अधिक सुविधाजनक आणि प्रभावी खत आहे. जे एकासह एकाच खतातून पिकांना चार वेगवेगळ्या आवश्यक पोषक घटक पुरवते. पॉलीसल्फेट सर्व प्रकारच्या मातीत आणि पिकांसाठी एक उपयोगी नैसर्गिक खत आहे.  पॉलीसल्फेटपासून मिळणारे सल्फरमुळे पिकांमध्ये नायट्रोजनचा उपयोग वाढत जातो,  आणि नायट्रोजन उपयोगिताची कार्यदक्षता (एनयूई) मध्ये सुधार करते. पिकांमध्ये प्रथिने (प्रोटिन) निर्माण होण्यासाठी सल्फर (गंधक) आणि नायट्रोजनच्या पौष्टिकतेचे संतुलन राखणे खूप आवश्यक असतं. पॉलीसल्फेटमध्ये क्लोराईड (सीएल) कमी प्रमाणात असल्याने हे क्लोराईड तंबाखू, द्राक्षे, चहा इत्यादी पिके आणि बटाटटे यासारख्या संवदेनशील कोरड्या पदार्यासाठी सर्वात योग्य खत आहे.

मातीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी फायदेशीर आहे:

पॉलीसल्फेट सामान्य पीएचचं खत आहे. यासाठी मातीच्या आरोग्यासाठी सर्व परिस्थिती उपयुक्त आहे.इतर खतांपेक्षा पॉलीसल्फेटला त्याच्या नैसर्गिक अवस्थेच्या उपयोगासाठी आयसीएल द्वारे उपलब्ध केलं जातं. पॉलीसल्फेट, उत्तरी समुद्राच्या खाली युकेच्या किनाऱ्यावर असलेल्या आयसीएल क्लीवलँडच्या खाणीतून १२५० मीटर खोलातून काढलं जात आहे आणि याला काडण करुन , छानणी करुन गोणीत भरलं जात आहे, आणि जगाच्या पाठीवर पोहचवलं जात आहे. पॉलीसल्फेटच्या उत्पादनात कोणतीच रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे नैसर्गिक खत सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त आहे. पॉलीसल्फेटचे उत्पादन कार्बन उत्सर्जन (०.०३४ किलोग्रॅम प्रति किलो उत्पादन)  खतांच्या विस्तृत श्रेणीच्या तुलनेत हे फारच कमी आहे, जे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचे आहे.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे सल्फर, पोटॅशिअम, मॅग्निशिअम आणि कॅल्शिअमच्या पुरवठ्यासाठी पॉलीसल्फेट जगभरात निवडलं जाणारं खत आहे. भारतातही ते पॉलीहायलाईट नावाने इंडियन पोटाश लिमिटेड उपलब्ध करुन देत आहोत. अधिक माहितीसाठी आपण आम्हाला www.fertilizers.sales@ICL-group.com वर लिहू शकतात. पॉलीसल्फेटच्या अधिक माहिती www.polysulphate.com वर उपलब्ध आहे.

English Summary: Polysulphate: An important natural fertilizer for sustainable agriculture
Published on: 05 May 2021, 04:38 IST