पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता.
(PM Kisan Yojna)पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करुन योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब (Central Government) केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून
नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवायसी’ ची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
31 मार्चची डेडलाईन
देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसी ची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजा या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून आता याकरिता केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे.आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे
आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.
Published on: 22 February 2022, 08:04 IST