Agripedia

फळझाडांच्या/भाजीपाला पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिक

Updated on 17 November, 2022 11:45 AM IST

फळझाडांच्या/भाजीपाला पिकांच्या सभोवती, जमिनीवर मल्चिंगसाठी तयार केलेली प्लास्टिक फिल्म टाकल्यावर पाण्याचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टाळता येतो. तसेच त्यामुळे तणांची वाढ होत नाही.१.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (https://mahadbtmahait.gov.in) या ऑनलाईन

संकेतस्थळावर नोंदणी करावी.२.अर्थसहाय्यचे स्वरूप - अ . सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी मापदंड

पिकांमध्ये मॅग्नेशियम करतंय तरी काय? आणि पिकांत नसल्याने काय होते?

रुपये ३२०००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये १६०००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. The subsidy is payable up to a maximum area limit of 2 hectares.

ब . डोंगराळ क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी मापदंड रुपये ३६८००/- असून या खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये १८४००/- प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे. ३. कोण सहभाग घेऊ शकतात - अ. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य देय आहे.

४. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे अ . ७/१२ब. ८ अ क.आधार कार्डाची छायांकित प्रत ड.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रतअधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

English Summary: Plastic Mulching under National Horticulture Mission
Published on: 16 November 2022, 03:08 IST