भुईमूग हे तेलबियावर्गीय पिक असून या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये भुईमुगाची पेरणी फेब्रुवारी महिन्यात करतात.परंतु भुईमुगाची लागणाऱ्या तापमानाचा विचार केला तर जेव्हा हे पीक फुलोरा अवस्थेत असते तेव्हा तापमान 20 ते 24 अंश सेंटिग्रेड असणे खूप महत्त्वाचे असते तसेच शेंगा तयार होण्याचा कालावधी असतो त्यामध्ये 24 ते 27 अंश सेंटिग्रेड तापमानाची गरज असते.
परंतु जर तापमान 13 अंश सेंटिग्रेडच्या खाली गेले तर या पिकाची वाढ खुंटते. बऱ्याचदा भुईमुगाची लवकर पेरणी करून नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पेरणी करून पाणी कमी होण्यापूर्वी काढणी करन्याला अनेक प्रकारच्या तापमानाच्या मर्यादा निर्माण होतात. यासाठी जर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केला तर भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरमध्ये व काढणी मार्च अखेरपर्यंत करणे सहज शक्य होते.
भुईमूग पिकासाठी प्लास्टिक आच्छादनाचे फायदे
1- जमिनीच्या आतील तापमान पाच अंश ते 8 अंश सेंटिग्रेडने वाढते. भुईमुगाची उगवण सुमारे सात ते आठ दिवस लवकर होते.
2- उष्णतेमुळे जमिनीतून जे काही पाण्याचे बाष्पीभवन होते त्याला अटकाव होतो व त्यामुळे पिकासाठी लागणारे पाणी कमी लागते व पाण्याची बचत होते.
3- भुईमूग पिकासाठी जे काही उपयुक्त जिवाणू आवश्यक असतात त्यांची जमिनीत वाढ होते व त्यांची कार्यक्षमतेत सुधारणा होतात.
4- जमिनीमध्ये जे काही उपयुक्त जिवाणू असतात त्यांची वाढ झाल्यामुळे भुईमुगाची नत्र स्थिरीकरणाचे क्षमतेत वाढ होते व इतर आवश्यक अन्नघटक जसे की स्फुरद, पालाश इत्यादी घटकांची उपलब्धता देखील वाढते.
नक्की वाचा:झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत
3- मुळांची वाढ जोमदार होण्यास मदत होते व एकूण विस्तार वाढतो.
4- पिकाची वाढ जोमदार झाल्यामुळे फुले लवकर आणि जास्त प्रमाणात येतात व शेंगांचे प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी मिळतो.
5- भुईमुगाच्या काही आऱ्या उशिरा येतात व त्यामुळे त्या कमकुवत असल्यामुळे जमिनीत गेलेल्या आऱ्यामध्ये दाणे चांगले पोसले जातात व सर्व शेंगा एकाच वेळी भरण्यास मदत होते. तसेच शेंगामधील तेल व प्रथिनांचे प्रमाण देखील वाढते.
6- भुईमूग साधारण आठ ते दहा दिवस लवकर काढणीस तयार होतो.
7- भुईमुगाची वाढ जोमदार झाल्यामुळे रोगांचे प्रमाण देखील कमी होते व शेंगांचे उत्पादन वाढते.
नक्की वाचा:इफको नॅनो युरिया (द्रव) खताबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Published on: 26 September 2022, 01:47 IST