भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोक शेती व्यवसाय करून आपले दैनंदिनी जीवन जगत आहेत. शेतीमधील मिळणारे उत्पन्न आणि जोडव्यवसाय करून शेतकरी पैसे जमवत आहेत. सध्या च्या काळात शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या तोंड काढून उभ्या राहिल्या होत्या.त्यामध्ये खत टंचाई, अतिवृष्टी, अवकाळी, आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकरी सदैव अडचणीत येत आहे. निसर्गातील झालेला बदल हा पिकांवर खूप परिणामकारी असतो. निसर्गात झालेल्या बदलांमुळे पिकांवर रोगराई पडते अशी अनेक वेगवेगळी कारणे आहेत.सध्या च्या काळात शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे खूप गरजेचे आहे. शेतीमध्ये आधुनिकता आणि रासायनिक खतांचा वापर वाढवून शेतामध्ये उत्पन्न वाढवले पाहिजे. तसेच शेतामध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब सुद्धा केला पाहिजे.
निलगिरी पासून मिळणारे उत्पन्न आणि नफा:-
निलगिरी झाडाला फारसे पाणी लागत नाही शिवाय निलगिरीच्या झाडांच्या लागवडीला जास्त खर्च येत नाही. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे 3 हजार झाडांची लागवड करता येते. निलगिरीच्या रोपांची किंमत ही कमीत कमी 7 रुपये ते 8 रुपये एवढी आहे. हेक्टरी खर्च हा सुमारे 25 हजारांपर्यंत येतो. 4 वर्ष्याच्या काळानंतर एका झाडापासून सुमारे 400 ते 500 किलो लाकूड मिळते. म्हणजेच एका हेक्टर मधून आपल्याला 12 लाख किलो लाकूड मिळते. बाजारात हे लाकूड 6 ते 7 रुपये किलो ता दराने विकले जाते शिवाय बाजारात या लाकडाला प्रचंड मागणी सुद्धा आहे. म्हणजेच हेक्टरी उत्पन्न हे 70 लाख ते 72 लाखांपर्यंत मिळते.
मोठ्या प्रमाणात हे लाकूड उपयोगात आणले जाते :
सध्या शेतामध्ये निलगिरी ची लागवड करणे खूप गरजेचे आणि फायदेशीर झाले आहे. निलगिरी हे झाड प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया देशाचे आहे. निलगिरी हे झाड खूप झपाट्याने वाढत असते शिवाय यातून बक्कळ नफा सुद्धा मिळतो.निलगिरीचा उपयोग अनेक ठिकाणी होतो निलगिरीच्या पानांपासून वेगवेगळी औषधे तयार केली जातात तसेच औषधी तेल सुद्धा तयार केले जाते. निलगिरीच्या खोडाच्या लगद्यापासून कागद निर्माण केला जातो. त्या लाकडापासून जहाज बांधणी, रेल्वे स्लीपर्स इत्यादी साठी केला जातो. निलगिरी झाडाची उंची ९० मीटरपर्यंत वाढते. तसेच निलगिरीच्या झाडाच्या खोडावरील त्वचा तुकड्या तुकड्यात गळून खाली पडतात. त्यापासून कागद तयार केले जाते.
लागवडीसाठी उपयुक्त जमीन:-
निलगिरी हे झाड कोणत्याही ठिकाणी चांगले येते शिवाय अन्य खर्च अजिबात नाही. निलगिरी चे झाड कोणत्याही वातावरणात योग्य वाढते शिवाय कष्ट कमी लागतात. शेतकरी वर्गाच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. तसेच जास्तीत जास्त शेणखताचा वापर आवश्यक असतो.तसेच निलगिरीच्या झाडांना 40 ते 50 दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते. तसेच शेतातील तणापासून झाडांचे संरक्षण करणे गरजेचे असते. आपल्या देशामध्ये निलगिरीच्या अनेक प्रजाती आहेत त्यामध्ये निलगिरी नायटेन्स, निलगिरी ऑब्लिक्वा, निलगिरी विमिनालिस, निलगिरी डेलेगेटेन्सिस, निलगिरी ग्लोब्युल्स आणि निलगिरी डायव्हर्सिकलर या मोठ्या प्रमाणात आढळतात.
Published on: 10 February 2022, 06:32 IST