Agripedia

भुईमूग हे तीनही हंगामांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक असून, ते सर्वात जुने तेलबिया पीक आहे. तसेच हे पीक महाराष्ट्र व देशात सर्वत्र प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते, परंतु तुलनेने उन्हाळी भुईमूग लागवडीचे क्षेत्र कमी असूनही उत्पादकता अधिक आहे.

Updated on 24 February, 2021 4:06 PM IST

भुईमूग हे तीनही हंगामांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक असून, ते सर्वात जुने तेलबिया पीक आहे. तसेच हे पीक महाराष्ट्र व देशात सर्वत्र प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते, परंतु तुलनेने उन्हाळी भुईमूग लागवडीचे क्षेत्र कमी असूनही उत्पादकता अधिक आहे.

पेरणीचा योग्य कालावधी

साधारणत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान पेरणी पूर्ण करावी.

जमीन

भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असावी. वाळूमिश्रित, चिकणमाती व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन हवी असते. या प्रकारच्या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते व रोग शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

हवामान

भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानात ही वाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. तसेच पेरणीच्या वेळेस रात्रीचे तापमान १८ डीग्री सेल्सिअस पेक्षा कमी नसावे व त्यानंतरच्या  दिवसांमध्ये दिवसाचे तापमान २४ ते २५ डिग्री सेल्सिअस असावे.

बियाणे प्रमाण

पेरणीकरिता सुमारे १०० ते १२५ किलो  असावे. बियाण्याचे प्रमाण ठरविण्याकरता सूत्र

                         हेक्‍टरी झाडांची संख्या X  १०० दाण्याचे  वजन

हेक्टरी बियाणे किलो =

                              उगवणशक्ती (%) X १०००

तसेच उपट्या वाणासाठी १०० किलो प्रति हेक्‍टर व पसर् या  ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे.

सुधारित वाण

एस.बी. ११

टि.ए.जी. – २४

जे. एल. – २८६

जे. एल. -५०१

टि. जी. -२६

बीज प्रक्रिया

बियाण्यास २ किंवा ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात कार्बेन्डाझीन बीजप्रक्रिया करावी व जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या घटकाची ५ ग्रॅम प्रति किलो व प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.

पेरणी पद्धत

पेरणी ३०X १० सेमी किंवा ३०X १५सेमी किंवा ४५ X१०सेमी अंतरावर करावी. बियाणी ५-६  सेमी खोल पेरावे. पेरणीसाठी सरी वरंबा किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करावा.

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळेस संपूर्ण रासायनिक खताची मात्रा द्यावी त्यामध्ये नत्र २५ किलो प्रति हेक्‍टर स्फुरद ५०  किलो प्रति हेक्‍टर तसेच जिप्सम 400 किलो प्रति हेक्‍टर वापरावे आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे मध्ये बोर्रॉन पाच किलो प्रति हेक्‍टर पेरणी वेळी द्यावी किंवा ०.१%फवारणी करावी.२० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे किंवा २.५ किलो प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.

तण व्यवस्थापन

पहिले ५ ते १० आठवड्यापर्यंत पिक तणविरहित ठेवावे. तसेच तननाशक वापरायचे झाल्यास पेरणीनंतर २० दिवसांनी इमॅझिथापर याचा वापर २ मिली प्रति लिटर पाण्यात वापरावे.

पाणी व्यवस्थापन

जमिनीनुसार साधारणता उन्हाळी  १५ ते १७  पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

काढणी

साधारणपणे ८० ते ८५ टक्के शेंगा परिपक्व झाल्यास, पूर्ण पाला पिवळा दिसू लागल्यावर ८ ते १० टक्क्यांपर्यंत ओलाव्याचे प्रमाण खाली आल्यानंतर काढणी करावी.

उत्पादन

२५ ते ३० क्विंटल  वाळलेल्या शेंगा प्रति हेक्‍टर व ५ टन कोरडा पाला प्रती हेक्टर.

 

लेखक

प्रा.विशाल एस. भाकडे

( सहाय्यक प्राध्यापक)

कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.

प्रा. अजय एस. सोळंकी

( सहाय्यक प्राध्यापक)

कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.

प्रा. अजय डी. शेळके

 ( सहाय्यक प्राध्यापक) 

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

 

English Summary: Planting technology of summer groundnut crop
Published on: 26 January 2021, 10:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)