Agripedia

भारत कृषीप्रधान देश आहे, भारतातीलअर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधले जाते. शेती हा एक बारामाही चालणारा व्यवसाय आहे, भारतात प्रामुख्याने तीन हंगामांत शेती केली जाते. सध्या देशात सर्वत्र रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. अशातच आज आपण जानेवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधव नव्या वर्षात या पिकांची लागवड करून चांगली मोठी कमाई करू शकतील. चला तर मित्रानो वेळ न दवडता याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Updated on 29 December, 2021 11:15 AM IST

जानेवारी महिन्यात घेतली जाणारी पिके- टोमॅटो- भारतात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड आपणास बघायला मिळेल, कृषी वैज्ञानिकांच्या मते आणि अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मते जानेवारी महिना हा टोमॅटो लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट महिना असतो. परंतु जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी पडते आणि थंडीमुळे दव पडण्याची भीती जास्त असते, त्यामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून दंवसाठी उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

मिरचीचे पीक

राज्यात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड बघायला मिळते, साधारणता मिरचीची लागवड ही जानेवारी महिन्यात जास्त बघायला मिळते. असे असले तरी मिरची साठी लागणारी रोपे ही नोव्हेंबर महिन्यातच तयार करायला सुरुवात केली जाते. नोव्हेंबर महिन्यात मिरचीसाठी रोपवाटिका तयार केली जाते आणि ही रोपवाटिका जानेवारी महिन्यापर्यंत पूर्णता विकसित होते आणि मिरचीची रोपे ही पुनर्लागवडीसाठी रेडी होतात. मिरचीच्या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी रोप ते रोप मधील अंतर 18 इंच असावे असे सांगितले जाते. मिरची पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी पुनर्लागवडी आधी शेतात चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. तसेच आपल्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार इतर पोषक घटक देखील टाकण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी आपण कृषी वैज्ञानिक याचा सल्ला घेऊ शकता.

मुळा

मुळ्याची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान केली जाते, मुळा ची विशेषता पुसा हिमानी या वाणांची लागवड या काळात अधिक बघायला मिळते. मुळ्याची ही जात 40 ते 70 दिवसांच्या आत काढणीसाठी तयार होते. या पिकातून चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त करण्यासाठी वेळेवर पाणी देणे आवश्‍यक ठरते तसेच वेळेवर निंदनी करणे देखील महत्वाचे असते. पाणी व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊन या पिकातून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.

English Summary: planting of these crops in the month of january will be benificial for farmers
Published on: 29 December 2021, 11:15 IST