सध्याच्या काळात अनेक युवा शेतकरी आपल्या शेतामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून त्यातून बक्कळ पैसे कमवत आहेत. सध्या च्या युगात शेतीला तंत्रज्ञानाची जोड असणे खूप गरजेचे आणि आवश्यक बनले आहेत.आपल्या देशातील बहुतांशी लोक शेती करून आपले पालनपोषण करत असतात. शेतीबरोबरच शेतकरी काही जोडव्यवसाय सुद्धा करत असतात त्यामध्ये शेळीपालन, दुग्धव्यवसाय इत्यादी. परंतु काही जण आपल्या शेतामध्ये वेगवेगळी आणि विदेशी झाडांची लागवड करून त्यापासून हजारो लाखो रुपये सुद्धा कमवत आहेत.
बदाम हे एक खूप महागडे ड्रायफ्रुट आहे. याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. बदामाचे पीक हे भारताव्यतिरिक्त अनेक अन्य देश सुद्धा घेत असतात. बदामाचा उपयोग खाण्यासाठी मिठाई बनवण्यासाठी केला जातो. शिवाय बाजारात याला प्रचंड मागणी तसेच भाव शुद्ध खूप आहे. त्यामुळे अलीकडे शेतकरी वर्ग बदामाच्या शेतीकडे वळू लागले आहेत. बदामाची शेती ही व्यापारी दृष्टीने केली जातेय. सध्या भारतामध्ये बदामाची लागवड प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या थंड वातावरणाच्या परिसरात केली जात आहे.
बदाम लागवडीसाठी आवश्यक माती:-
रानात बदाम लागवडीसाठी चिकणमाती, खोल तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वोत्तम आहे. तसेच बदामाची झाडे ही जड किंवा खराब निचऱ्याच्या जमिनीत चांगली वाढ होत नाही. बदामाची लागवड 7 अंश ते 25 अंश असलेल्या हवामान भागात करू शकतो. आपल्या भागातील वातावरण आणि हवामान बादम लागवडीसाठी आवश्यक तसेच पोषक आहे.
बदामाचे आरोग्यदायी फायदे:-
बदामाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच बदामाचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. बदामाचे नियमित सेवन केल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. बदाम खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते तसेच हाडे आणि आपले जात मजबूत आणि तंदुरुस्त राहतात.
बदामापासून मिळणारे उत्पन्न:-
शेतामध्ये बदाम लागवडी नंतर सुमारे 3 ते 4 वर्ष्यात फळ येण्यास सुरुवात होते. बदामाचे झाड 6 वर्ष्यानी संपूर्ण क्षमतेने फळ देते. एकदा लागवड झाल्यावर बदामाचे झाड तब्बल 50 वर्षे उत्पन्न देते. सध्या बाजारात बदामाची किंमत ही 600 ते 1000 रुपये प्रतिकिलो आहे. तसेच प्रत्येक वर्षी एका झाडातून कमीत कमी 2 ते 3 किलो बदाम मिळतात म्हणजेच एक झाड कमीत कमी 3 हजार रुपयांचे उत्पन्न देते.साधारणपणे, बदामाचे झाड 3-4 वर्षात फळ देण्यास सुरुवात करते, परंतु बदामाच्या झाडाला पूर्ण क्षमतेने फळ देण्यास सुमारे 6 वर्षे लागतात. एकदा लागवड केल्यानंतर बदामाचे झाड 50 वर्षे फळ देऊ शकते. तुम्ही लागवड करत असलेल्या बदामानुसार त्याचा नफा ठरवता येत असला, तरी बदामाचा दर्जा त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे सांगते. बाजारात बदामाची किंमत 600 ते 1000 रुपये प्रतिकिलो आहे. एका झाडातून दरवर्षी 2-2.5 किलो सुके बदाम मिळतात
शेती करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:-
1)बदाम लागवडीआधी शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे तसेच हवामान कश्या प्रकारे आहे याचे निरीक्षण करून लागवड करावी.
2)बदामाच्या झाडाला उन्हाळा ऋतु मध्ये किमान 10 दिवसातून पाणी देणे आवश्यक असते.
3) बदामाच्या झाडांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याला बांबूचा आधार द्यावा.
4) तसेच जमिनीची योग्य मशागत आणि व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
Published on: 15 February 2022, 04:52 IST