भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे देशातील 75 टक्के जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शिवाय राहिलेले नोकरी व्यवसाय यामधून आपली उपजीविका करत असतात. आपल्या देशातील शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात त्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस यांचा समावेश होतो. आपल्या देशात पिकाचे दोन हंगाम असतात ते म्हणजे एक रब्बी हंगाम आणि दुसरा खरीप हंगाम. या दोन्ही हंगामात भुसार आणि नगदी या प्रकारची पिके घेतली जातात.
अश्वगंधाची लागवड करून बक्कळ पैसे कमवू शकतो:
सध्या च्या बदलत्या पीक पद्धती मुळे पिकांच्या हंगामामध्ये आणि काळामध्ये मोठा प्रमाणात बदल घडून आला आहे. शेतकरी वर्गावर सदैव संकंटाची मालिका कायम असते. कधी अवकाळी पाऊस तर कधी खतांची टंचाई यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडत आहे.याव्यतिरिक्त सुद्धा शेतीमध्ये पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवले पाहिजे यामध्ये औषधी वनस्पती ची लागवड करून आपण भरपूर पैसे कमवू शकतो. आपण इतर पिकांची लागवड करण्यापेक्षा अश्वगंधाची लागवड करून बक्कळ पैसे कमवू शकतो.सध्या बाजारात औषधी वनस्पती ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भाव सुद्धा चांगला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सरकार औषधी वनस्पतींच्या लागवडी साठी प्रोत्साहन देत आहे. यामधील एक असलेले म्हणजे अश्वगंधा. अश्वगंध हे एक प्रकारचे नगदी पिकच आहे.
अश्वगंधाची लागवड:-:
अश्वगंधाची लागवड करण्यासाठी अत्यंत सोपी अशी पध्दत आहे. अश्वगंधाची लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. अश्वगंधाची लागवड ही आपण चिकणमाती माती किंवा हलकी लाल माती मध्ये सुद्धा करू शकतो. ज्या जमिनीचा पोत मूल्य 7.5 ते 8 च्या दरम्यान असावा. अश्वगंधा चे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केली की सलग पाच वेळा आपण पीक घेऊ शकतो. तसेच या वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी 20 ते 35 अंश तापमान व वार्षिक 500 ते 750 मिलिमीटर पाऊस असणे खूप गरजेचे आणि आवश्यक आहे. वनस्पतींच्या वाढीच्या वेळी जमिनीत कोरडे हवामान व मुबलक ओलावा असणे आवश्यक असते.
एकरी 10 हजार रुपये खर्च आणि 70 हजार रुपये उत्पन्न:-
जर तुम्ही लागवड करण्यापासून ते अगदी शेवट पर्यंत जर योग्य प्रकारे जोपासना केली तर तुम्हास अधिक उत्पन्न मिळते. मात्र चांगल्या काढणीसाठी जमिनीमधील ओलावा तसेच कोरडे हवामान असणे खूप आवश्यक आहे. सिंचित आणि अनिर्बंध अशा दोन्ही पपरिस्थितीमध्ये हे पीक आपणास घेता येते. क्षारयुक्त पाण्यामधे अश्वगंधाची लागवड सुद्धा करण्यात येते असे काही संशोधनात सांगितले आहे. जर तुम्हाला अश्वगंधाची लागवड करायची असेल तर ती एक हेक्टर क्षेत्रात तुम्हाला १० हजार रुपये खर्च येतो. एका एकरातून शेतकऱ्यांना जवळपास ५ क्विंटल मूळ तसेच बियाणे मिळतात जे की शेतकऱ्यांना सुमारे ७८ हजार रुपये फायदा भेटवून देतात. तुम्ही एकर एकरमध्ये अश्वगंधा ची लागवड केली तर सर्व खर्च वजा होऊन तुमच्या हातात सुमारे ६८ हजार रुपये राहणार आहेत.
Published on: 12 May 2022, 04:07 IST