Agripedia

शेती हा भारताचा प्राचीन व्यवसाय आहे. भारतात शेती ही परंपरागत पद्धतीने केली जाते. ग्रामीण भागात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचे अधिक प्रमाणात उत्पन्न वाढीसाठी तांदळाचे शेतीसुद्धा उपयुक्त ठरेल. तांदळाचे असे काही प्रकार आहेत की ज्यांची शेती केल्याने आपल्याला अधिक प्रमाणात फायदा होऊ शकतो.

Updated on 03 June, 2022 1:11 PM IST

शेती हा भारताचा प्राचीन व्यवसाय आहे. भारतात शेती ही परंपरागत पद्धतीने केली जाते. ग्रामीण भागात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतीचे अधिक प्रमाणात उत्पन्न वाढीसाठी तांदळाचे शेतीसुद्धा उपयुक्त ठरेल. तांदळाचे असे काही प्रकार आहेत की ज्यांची शेती केल्याने आपल्याला अधिक प्रमाणात फायदा होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया तांदळाच्या वाणांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत..

श्रीराम सोनाली :

श्रीराम सोनाली तांदूळ 120 ते 125 दिवसांत तयार होतो. हा प्रकार सुगंधित असून याचे लांब बारीक दाणे असतात.

पायनियर 27 p 31 :

पायनियर 27 p31 या धाणाचे पीक हे 128 ते 132 दिवसात तयार होते. या तांदळाचे दाणे मध्यम लांब व चमकदार आणि खाण्यासाठी स्वादिष्ट असतात. या धाणांची उंची 100 ते 110 सेमीपर्यंत असू शकते. एका एकरात 28 ते 30 क्विंटल उत्पन्न मिळून जाते.

हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार उसावरील एफआरपी 15 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याची शक्यता, कॅबिनेट नोट जारी

पुसा बासमती :- 1460

हा वाण देशातील सर्व क्षेत्रात आणि सिंचन पद्धतीमध्ये लावले जाते, हे जास्त उत्पन्न देणारे वाण आहे. रोगप्रतिरोधक प्रकार आहे हेच सुगंधित तांदूळ प्रकार 135 दिवसांत तयार होते. याची उत्पन्नाचे क्षमता 50 ते 55 क्विंटल प्रति हेक्‍टर आहे.

 

पुसा बासमती 11:21 :

पुसा बासमती 11:21 प्रकार बासमती तांदूळ पिकवण्यासाठी पूर्ण क्षेत्र सिंचन क्षेत्रात लावणे उपयुक्त आहे. हे बासमती तांदूळ 140ते 145 दिवसात तयार होते. या वाणाचा दाणा 8.0 मी बारीक आहे. याची उत्पत्ती क्षमता 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्‍टर आहे.

पुसा सुगंध 5 (25 11)-:

पंजाब, प्रकार हरियाणा, दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश व जम्मू-काश्मीर या भागात पुसा सुगंध 5 ची लागवड केली जाते. संचित पद्धतीच्या शेतीतून याचे उत्पन्न घेतलं जातं. तांदळाचा हा वाण सुगंधीत आणि अधिक लांब असतो.  या सुगंधित प्रकाराचा दाणा चांगल्या सुगंधाचा आणि अधिक लांब असतो. हा प्रकार 125 दिवसांमध्ये पिकून तयार होतो. यांच्यात 60 ते 70 क्विंटल प्रति हक्टर उत्पन्न मिळते.

पुसा सुगंध 2 :

हे प्रकार पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड या भागात सिंचन पद्धतीने या वाणाचे उत्पन्न घेतलं जातं. या वाणातून उत्पन्न मिळण्यासाठी 120 लागतात. तर अधिक उत्पन्नासाठी हे वाण चांगले आहे. या प्रकारातून 55 ते 60 क्विंटल प्रति हक्टर उत्पन्न मिळू शकते.

पुसा बासमती 1692 :

हे तांदूळ 110 ते 115 दिवसांत तयार होते. पुसा बासमती तांदूळची उत्पादन क्षमता असून प्रति एकरात 27 क्विंटल पर्यंतचे उत्पन्न मिळत असते. याचा दाणा लांब आणि स्वादिष्ट असतो. हे तांदळाचे दाणे जास्त तुटत नाही. हे तांदळाचे प्रकार अधिक प्रमाणात दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेश जास्त उपयुक्त आहे.

 

एराईज 6444 :

हे तांदूळ 135 ते 140 दिवसांत तयार होते. या तांदुळाच्या दाणा लांब आणि आकाराने मोठा असतो. हे मध्येम सिंचित क्षेत्रात उपयुक्त असते. याची पेरणी 135 -140 दिवसात तयार होते. तसेच प्रति हेक्टर क्षेत्रात 80 ते 90 क्विंटल उत्पन्न मिळते.

श्रीराम रेश्मा:

हे तांदूळ 100 ते 115 दिवसात तयार होते या धानाची लांबी 90 ते 110 सेमी असते. या प्रकाराला इतर प्रकरापेक्षा कमी पाण्याची आवश्यकता असते. या प्रकाची पेरणी 15 मे ते 15 जूनपर्यंत आहे.

पुसा बासमती 1718:

हे तांदूळ 135 ते 140 दिवसात तयार होते. या तांदुळाच्या दाणे लांब आणि स्वादिष्ट असतात. याचे उत्पन्न 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर येत असते. पुसा बासमती तांदळाचे अधिक उत्पन्न उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार आणि तमिळनाडूमध्ये अधिक प्रमाणात घेतले जाते.

English Summary: Plant these 10 improved varieties of rice higher yields, the higher the profit will be
Published on: 03 June 2022, 01:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)