ह्या पेरातील अंतर आपल्याला त्या झाडाला मिळत असलेले वातावरण व त्याची स्थिती सांगत असते. म्हणून पेरातील अंतर हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे.पेरातील अंतर जास्त असल्यास:सामान्यपणे पेरातील अंतर गरजेपेक्षा जास्त असेल तर ते झाडांसाठी/उत्पन्नासाठी खूप चांगले मानले जात नाही. अश्या स्थितीत झाडावर येणारी फुले किंवा फळे कमकुवत असतात.लागवडीच्या वेळी दोन झाडांतील अंतर हे खूप कमी असल्यास झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा लागते. या स्पर्धेत झाडांची वाढ भराभर होते. यादरम्यान पेरातील अंतर वाढते.
जर अशी स्थिती खूप काळ राहिली तर पेरातील अंतर जास्त राहते आणि झाड त्याच्या क्षमतेपेक्षा खूप कमी उत्पन्न देते.कधीकधी असेही होते की उन्हाळ्यात झाडाला जास्त उष्णतेचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून झाड स्वतःच काही हॉर्मोन्स तयार करते आणि झाडाला संदेश जातो की पेरातील अंतर वाढवा. पण हे सगळ्याच झाडांमध्ये होत नाही. म्हणून आपण अभ्यासपूर्वक लक्ष देऊन झाडाचे निरीक्षण करायला हवे.पेरातील अंतर कमी असल्यास:सामान्यपणे पेरातील अंतर कमी असल्यास ते झाडांसाठी/उत्पन्नासाठी चांगले मानले जाते.
प्रकाश संश्लेषण क्रिया जलद गतीने होत असेल तर झाडात भरपूर अन्न तयार होते. झाडाला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाल्यास असे होते व पेरातील अंतर जास्त न वाढता योग्य प्रमाणात राहते. पण पेरातील अंतर कमी असल्यास ते प्रत्येक वेळी चांगलेच आहे असे नाही. जर पेरातील अंतर कमी आहे आणि झाडाची पाने पिवळी पडून गळून जात असतील तर ते नायट्रोजन च्या कमतरतेचे लक्षण असू शकते. कधीकधी झिंक कमी पडले तरी पेरातील अंतर कमी राहू शकते.
कधीकधी द्राक्ष किंवा तत्सम झाडांमध्ये कार्बोहायड्रेट चे प्रमाण कमी असेल तर नवीन येणाऱ्या फुटीमध्ये झाडाची वाढ कमी होते आणि पेरातील अंतर कमी राहते.आपण आपल्या पिकासाठी पेरातील अंतर किती असायला हवे ह्याचा अभ्यास करायला हवा. ते जर खूप जास्त किंवा खूप कमी असेल तर त्यानुसार उपाययोजना कराव्यात. बऱ्याचदा असेही होते की पेरातील कमी अंतर हे पुढे येणाऱ्या अडचणींचे द्योतक असते. म्हणून झाडाकडे संपूर्णपणे लक्ष असायला हवे.
Published on: 07 May 2022, 07:40 IST