Agripedia

करडई हे एक प्राचीन तेलबिया पीक आहे. त्याचा वापर प्राचीन काळापासून केसरी रंग मिळवण्यासाठी आणि बियापासून तेल काढण्यासाठी होत असे. परंतु सध्या कृत्रिम रंगाचा उपलब्धतेमुळे करडईचा वापर फक्त तेल काढण्यासाठी आणि कोवळ्या पानांचा वापर हा पालेभाजी म्हणून करण्यात येतो.

Updated on 26 October, 2020 3:26 PM IST


करडई हे एक प्राचीन तेलबिया पीक आहे. त्याचा वापर प्राचीन काळापासून केसरी रंग मिळवण्यासाठी आणि बियापासून तेल काढण्यासाठी होत असे. परंतु सध्या कृत्रिम रंगाचा उपलब्धतेमुळे करडईचा वापर फक्त तेल काढण्यासाठी आणि कोवळ्या पानांचा वापर हा पालेभाजी म्हणून करण्यात येतो. करडईचे लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याआधी आपण या पिकाविषयी इतिहास जाणून घेऊ.

  • इतिहास

करडई प्राचीन भारताला सुद्धा परिचित होती आणि प्रख्यात प्राचीन कवी कालिदास यांनी तर करडईची तुलना शकुंतलाच्या सख्ख्या अशी केली आहे. संस्कृत साहित्यात करडईला कुसुम किंवा कुसुंबा म्हणून केली आहे. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती.

कालिदासाने ऋतुसंहारमध्ये रानातील वणव्याचे वर्णन करताना,

विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन ऋ.सं १-१७ अर्थ:नुकत्याच फुललेल्या कुसुंभाच्या नव्या कळ्यांनी स्वच्छ सिंदूराचा(शेंदुराच्या रंगाचा) भास होतो. असे वाटते कि भूमी ही दिशा-दिशांना (सर्व दिशांना) अग्निने जळत आहे.

आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना,कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः ऋ.सं ६-४ असे लिहिले आहे.

करडईचा वापर:-

करडईचे तेल पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडना समृद्ध असते.  त्यात लिनोईक अॅसिडचे प्रमाण ७० टक्केपर्यंत आहेत. करडईच्या तेलाची कोलेस्ट्रॉल कमी करण्याची फार मोठी भूमिका आहे आणि हे कोरडे तेल आहे. त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, स्पॉन्डॅलायसिस, उद्यरक्तदाब, मासिक पाळीतील इत्यादी रोग कमी होतात. हृदयरोग्यासाठी देखील करडईच्या तेलाची शिफारस केली जाते. हे तेल संधीवातावर उपाय म्हणून ओळखले गेले आहे. खोडामध्ये लिओसिलीसिकचे प्रमाण जास्त असते म्हणून पार्टीकल बोर्ड पेपरसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने इत्यादी शेतात विखुरले जातात. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो. पशुखाद्य म्हणून वापरल्या जाते त्यात २० टक्के प्रथिने असतात. हर्बल औषधे आणि औषधे तयार करण्यासाठी कोवळ्या पाकळ्यांचा वापर केल्या जातो.

मूळ:- वाविलोन भारत.

क्षेत्र आणि वितरण :-भारत, चीन, मेक्सिको, अर्जेंटिना, इथोपिया आणि ऑस्ट्रेलिया हे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतात ९८ टक्के क्षेत्र तीन राज्य म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश.

वातावरण:-

बियाणे उगवण करण्यासाठी मातीचे इस्टमान तापमान १५ ते १६ डिग्री सेल्सिअस इतके हवे. करी हे पिक एक दिवस तटस्थ पीक आहे. हे पीक दुष्काळ प्रतिरोध आणि पाणी असल्यास संवेदनशील आहे. ५०० ते ६०० मि. मी. पावसावर ते चांगले येते.

माती :- दुष्काळ प्रतिरोधक पीक असल्याने सर्व प्रकारच्या मातीत याची लागवड केली जाते. परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी, जास्त काळ पाणी साठवण क्षमता असलेली खोल जमीन ही सर्वोत्तम आहे.

 

जाती :-

मंजिरा, स्थारमुथ्यलु ( एपि आर आर) परभणी कुसुम, फुले कुसुम ,ए-१( राष्ट्रीय तपासणी)

  • संकरित जाती:-डी एसएच -१२९, नारी-15, नारी- 38, गिरणा, भीमा, शारदा, श्वेता.

पेरणीची वेळ 

हंगाम:-रब्बी


करडईची पिकाची पेरणी योग्यवेळी करणे फार महत्वाचे ठरते. पेरणी लवकर म्हणजे सप्टेंबर पहिला पंधरवडा केल्यास करडईच्या पिकाच्या पानावरील ठिपके या  बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो आणि मोठे नुकसान होते. त्यामुळे  उत्पादनात घट येते. तसेच  उशिरा पेरणी केल्यास म्हणजे ऑक्टोबर दुसरा आठवड्यानंतर पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. हे नुकसान होऊ नये म्हणून पिकाची पेरणी योग्यवेळेत करणे फायद्याचे ठरते. करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत योग्य ठरते. बागाईत करडईची पेरणी ऑक्टोंबर अखेरपर्यंत करावी.

पेरणीचे अंतर 
 कोरडवाहू जमिनीत दोन साऱ्यानमधील अंतर ४५ सें.मी आणि दोन रोपांतील अंतर २० सें.मी ठेवावे.

पाण्याचे व्यवस्थापन

करडई पिकासाठी पाण्याची आवश्यकता २५० ते ३०० मि. मी. इतकी आहे. करडई हे पीक साधारणता पावसाच्या पाण्यावर घेतले जाणारे पीक असून, उर्वरित पाण्याची गरज ही मातीतील आद्रतेमार्फत भागवली जाते. हे पीक दुष्काळ सहन करणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्याच्या खोल मुळांद्वारे जमिनीच्या खोल थरामधून पाणी शोषून घेण्याची त्याची क्षमता असते.  हलक्या जमिनीत दोन ते तीन पाणी सिंचित करावे. दुष्काळी स्थितीत एक जीवन वाचणारे पाणी द्यावेत. सिंचनाच्या मुख्य अवस्थाः गुलाब टप्पा सुरुवातीची वाढीचा अवस्था) हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे पेरणीनंतर २१  दिवसांनी आणि चार ते सहा पानांची अवस्था असताना सिंचन दिल्यास उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत वाढ निश्चित होऊ शकते.

बियाणे
प्रति हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे लागते. करडई या तेलबिया पिकाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

 पेरणीची खोली:- ४ ते ५ सें.मी.

विरळणी :- पेरणीनंतर १०-१५ दिवसा नंतर.

 


बीजप्रक्रिया
 

थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन २.५ ग्रॅम प्रति किलो कारादीच्या बियाण्यास चोळल्यास  म्हणजे उगवणीनंतर करडईचे पीक बुरशीजन्य रोगास बळी पडणार नाही तसेच अॅझोस्पीरीलम २५० ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास वापरल्यास हवेतील नत्राचे प्रमाण कमी होऊन उत्पादकतेत वाढ होते.

खतांच्या मात्रा  : करडई पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. जिरायती पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रतिहेक्‍टरी द्यावे.

काढणी : 
पीक १३०-१३५ दिवसांत काढणीस तयार होते. बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर व सकाळच्या वेळेस काढावीत. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी.

उत्पादन : 
सुधारित तंत्राचा वापर केल्यास मध्यम जमिनीत प्रतिहेक्‍टरी १२ ते १४ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते. 

 

  लेखक

श्री. अजय डी. शेळके

( सहाय्यक प्राध्यापक)  

डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

श्री. महेश डी. गडाख

 ( सहाय्यक प्राध्यापक)

डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा.

श्री. अजय एस. सोळंकी

( सहाय्यक प्राध्यापक)

कृषी महाविद्यालय कोंघारा, जि. यवतमाळ.

 

English Summary: Plant safflower by the end of October, knowing planting techniques
Published on: 26 October 2020, 03:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)