Agripedia

देशात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते त्यामध्ये पपईचा देखील समावेश आहे. पपईची लागवड खांदेश समवेतच संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते. पपई मध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात यामुळे पपईची मागणीदेखील बारामाही असते

Updated on 02 April, 2022 10:22 PM IST

देशात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते त्यामध्ये पपईचा देखील समावेश आहे. पपईची लागवड खांदेश समवेतच संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळते. पपई मध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात यामुळे पपईची मागणीदेखील बारामाही असते

असं सांगितलं जातं की, पपईची शेती ही दक्षिण मैक्सिको और कोस्टा रिका या देशात सर्वप्रथम आढळली होती. असे असले तरी आजच्या घडीला आपला देश पपईच्या उत्पादनात शीर्षस्थानी विराजमान आहे. भारताच्या नावावर सर्वाधिक पपई उत्पादनाचा रेकॉर्ड आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, जगातील एकूण पपई उत्पादनात भारताचा वाटा 46 टक्के एवढा आहे. असे असले तरी, भारत आपल्या एकूण पपईच्या उत्पादनापैकी फक्त 0.08% पपई निर्यात करतो, कारण उर्वरित पपई आपल्या देशातच वापरली जाते. देशातील प्रमुख राज्यांमध्ये पपई वर्षभर बाजारात उपलब्ध असते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया पपईच्या शेतीविषयी.

पपईची लागवड नेमकी केव्हा करायची - पपईची बिया जरी वर्षभर पेरता येतात, तरीदेखील चांगल्या दर्जासाठी आणि उच्च उत्पादनासाठी, पपई बियांची पेरणी जुलै ते सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात करावी, कारण पपई लागवडीसाठी उष्ण हवामान योग्य आहे. हिवाळ्यात दंव अधिक पडते आणि याचा पपई वर विपरीत परिणाम होतो. म्हणजेच, याच्या बिया उष्ण हवामानात चांगल्या वाढतात. पपईच्या बिया पेरणी करण्यासाठी अशा पपईच्या झाडापासून घ्या, जे निरोगी आहे आणि ज्यापासून चांगली आणि गोड फळे मिळतात.

पपई लागवड केल्यानंतर, दंव, जोरदार वारा, खते आणि पाण्याची स्थिरता याकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे.  खोल आणि चांगला निचरा होणारी वालुकामय चिकणमाती असलेली शेतजमीन याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते. कडक उन्हाळ्यात म्हणजे मे-जून महिना असतो तेव्हा पपईच्या झाडांना दर आठवड्याला पाणी द्यावे लागते त्यामुळे त्याची उत्पादन क्षमता वाढेल.

सर्व गोष्टींची काळजी घेऊन पपईची लागवड केली, तर पपई पिकातून चांगले उत्पादन येणे साहजिक आहे. पपईची चांगली काळजी घेतली तर प्रत्येक झाडापासून 50 किलो पपईचे उत्पादन सहज मिळू शकते. अर्थात लाखोंची कमाई सहज करू शकता. व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी ने समृद्ध असलेल्या पपईला बाजारपेठेत नेहमीच मागणी असते, मोठ्या शहरांमध्ये त्याची किंमत कधीकधी सफरचंदांच्या किमतींपेक्षाही अधिक असते.

संबंधित बातमी:-

शेतकऱ्याच्या स्वप्नाचा गळा घोटला! गोठ्यात अग्नितांडव दावणीला बांधलेली जनावरे देखील भाजली; यात दोष कुणाचा?

मोठी बातमी! मोदी सरकार किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावासाठी लवकरच स्थापित करणार समिती

English Summary: Plant papaya with this method and earn millions in less time
Published on: 02 April 2022, 10:22 IST