Agripedia

आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. बरेच लोक शेती करून उत्पन्न मिळवत आहेत. आपल्याकडे बरेच लोक शेती ही पारंपरिक पद्धतीने करतात त्यामुळे उपन्न कमी प्रमाणात मिळत आहे.शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतातील पिकाचे उत्पादन वाढवावे तसेच ज्वारी बाजरी गहू या व्यतिरिक्त शेतामध्ये नगदी पिकांची लागवड करावी त्यामध्ये ऊस कापूस कांदा इत्यादी.

Updated on 22 September, 2021 2:04 PM IST

आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. बरेच लोक शेती करून उत्पन्न  मिळवत  आहेत. आपल्याकडे बरेच  लोक शेती ही  पारंपरिक पद्धतीने करतात त्यामुळे उपन्न कमी प्रमाणात मिळत आहे.शेतकरी वर्गाने जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतातील पिकाचे उत्पादन वाढवावे तसेच ज्वारी बाजरी गहू या व्यतिरिक्त शेतामध्ये नगदी पिकांची लागवड करावी त्यामध्ये ऊस कापूस कांदा इत्यादी.

उत्पादन हे 15 लाख रुपयापर्यंत मिळत राहते:

एवढेच न्हवे तर फळबाग लावून सुद्धा तुम्ही लाखो रुपयांचा फायदा मिळवू शकता. फळबागेत पपई ची लागवड करून सुद्धा तुम्ही भरघोस उत्पन्न मिळवू शकता.पपई शेती हा फायद्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. एकदा रानात पपईची लागवड केली की कमीत कमी 2-3 वर्षे आपल्याला फळे मिळतात आणि लागोपाठ आपले  उत्पन्न  चालू  राहते.जरी  फळझाडांची  पडझड झाली किंवा काही रोगराई आली पपई चे वार्षिक उत्पादन हे 15 लाख रुपयापर्यंत मिळत राहते.पपई या फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण पपई ही कच्ची जरी असली तरी वापरता येते आणि परीपक्व झाल्यावर सुद्धा त्याचा उपयोग केला जातो.

हेही वाचा:आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून करा हळदीची लागवड अन् मिळवा लाखोंचे उत्पन्न

परिपक्व पपई चा उपयोग शिजवलेल्या फळांमध्ये समावेश करण्यासाठी केला जातो.तसेच कच्चा पपईची छान अशी भाजी सुद्धा बनविली जाते. यातून आपल्याला ‘अ’ जीवनसत्त्व आणि ‘व्हिटॅमिन सी’ ही जीवनसत्त्वे मिळतात. यामध्ये मूळ जातींसह विदेशी जातींचा समावेश आहे. आपल्या रानात पपई ची लागवड करण्यापूर्वी काही प्रमुख आणि मुख्य पपई च्या जाती माहित असणे खूप गरजेचे आहे.

विविध प्रकारच्या पपई च्या जाती:-

पुसा तीनी:- एका पपई च्या वनस्पतीतून आपल्याला 25 ते 30 किलो पपईचे उत्पन्न मिळते. पपई च्या या जातीची फळे आकाराने मध्यम किंवा लहान आकाराची असतात. तसेच या वाणाच्या वनस्पतींची उंची कमीत कमी 120 सेंमी.च्या जवळपास आहे.

पुसा जायंट :-या जातीची फळे आकाराने मोठी असतात. या जातीच्या पपई चा उपयोग भाज्या आणि पेटा बनवण्यासाठी केला जातो. या वाणाच्या पपई तुन आपण 30 –35 किलो फळांचे उत्पादन मिळवू शकतो. या पपई च्या प्रजातीच्या वनस्पती 92 सेंटीमीटर झाल्यावर फळ देण्यास सुरुवात होते.

पुसा डेलिसियास:- फळ क्षमता:-40 ते 50 किलो

सुर्या :- ही एक पपई ची प्रमुख संकरित जात आहे. त्यातील एका फळाचे वजन हे कमीत कमी 550 ते 650 ग्रॅम एवढे आहे. या जातीच्या रोपातून आपण 55 –56 किलो फळांचे उत्पादन मिळवू शकतो.

या पपई च्या वाणाच्या जातीची लागवड करून आपण वर्षाकाठी 15 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतो आणि आपले उत्पन्न वाढवू शकतो. फळ शेतीतून मिळालेले उत्पन्न आणि  हा  नफा  हा बक्कळ स्वरूपाचा असल्यामुळे फळ शेती करणे ही खूप गरजेचे आहे.तसेच फळशेती करताना तुम्ही त्या फळांच्या बागेत आंतरपीक पीक पद्धतिने दुसरी वेगवेगळी पिके सुद्धा घेऊ शकता. किंवा फुलशेती करून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता.

English Summary: Plant papaya in the field with proper planning, get an annual income of Rs 15 lakh
Published on: 22 September 2021, 02:03 IST