Agripedia

खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीपात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप प्रमाणात केली जाते.दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबूज पीक ओळखले जाते. जमीन व हवामान रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा. चोपण व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

Updated on 24 April, 2023 2:03 PM IST

खरबूज पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीपात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप प्रमाणात केली जाते.दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबूज पीक ओळखले जाते. जमीन व हवामान रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा. चोपण व पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

भारी जमिनीत पिकांना नियमित पाणी दिले नाही, तर फळे तडकतात. या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. म्हणून या पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी 24 ते 26 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. सुधारित जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधु, पंजाब सुनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारशीत केल्या आहेत. एकरी 350 ते 400 ग्राम बियाणे लागते.

1) पूर्वी खरबुजाची थेट बियाणे टोकून लागवड केली जात होती. परंतु सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्लॅस्टिक ट्रेमध्ये वाढविलेल्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. यामुळे वेळ यांचे योग्य प्रमाण, मजूर, पाणी आणि इतर निविष्ठावर होणारा खर्च वाचतो. आणि वेळेचीही बचत होते. 2) रोपे तयार करण्यासाठी साधारणत: 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपीट भरून बियाणे लागवड केली जाते.

शेतकऱ्यांनो कांदा बीजोत्पादन व्यवस्थापन, जाणून घ्या

3) 1.5 ते 2 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते.लागवडीनंतर पाणी द्यावे. 4) लागवड केल्यानंतर 8 ते 10 ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथिन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्यामुळे उबदारपणा टिकून राहतो.यामुळे बी लवकर उगवते.

5) रोप उगवल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर पेपर काढावा. व ट्रे खाली उतरवून ठेवावेत. 6) रोपे सडू नयेत म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साइडची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरला..

लागवडीपूर्वी 50:50:50 किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रतिहेक्‍टरी व लागवडीनंतर एक महिन्यांनी 50 किलो नत्र प्रति हेक्‍टर मात्रा द्यावी. दोन गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल येते. यांचे अंतर सात फूट असावे. वाफ्याचा वरचा माथा 75 सेमी असावा. वाफ्याच्च्या मधोमध लॅटरल टाकून यावर चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर अंथरून दोन्ही बाजूंनी पेपरवर माती झाकावी.

जेणेकरून पेपर वार्‍यामुळे फाटणार नाही. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर 2 इंच पाइप च्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रीपरच्या दोन्ही बाजूंना 10 सेमी अंतरावर छिद्रे पाडावीत. रोपे लावताना रोप व्यवस्थित दाबून, पेपरला चिकटणार नाही याची काळजी घेऊन लावावे.जेणेकरून रोपांची मर होणार नाही. अशा पद्धतीत एकरी सुमारे 7250 रोपे लागतात.

मधमाशीपेक्षा ३ पट अधिक मध देते ही मधमाशी, सरकारकडून 85 टक्के अनुदान..
Onion Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..
देशात दिवसभरात 10,112 कोरोना रुग्ण, 29 मृत्यू; गेल्या महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ..

English Summary: Plant melon in this month, earn good profit in 80 to 100 days..
Published on: 24 April 2023, 02:03 IST