भारतात मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात कापसाची शेती बघायला मिळत असते मराठवाडा विदर्भ आणि खानदेश मध्ये कापसाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. शेतकरी मित्रांनो यावर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक विक्रमी दर मिळाल्याने आगामी खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणार आहे. यामुळेच आज आपण कापसाची पेरणी नेमकी केव्हा करावी याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांनो कापसाच्या शेतीतून अधिक नफा प्राप्त करण्यासाठी कापूस पेरणीची वेळ सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी बांधव आता आपल्या रिकाम्या शेतात आगामी हंगामातील कापूस पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे तुम्हालाही तुमच्या शेतात कापूस पेरायचा असेल तर आतापासूनच पेरणीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर आपणास कापूस पेरणी करायची असेल तर यासाठी 15 एप्रिल ते 15 मे या दरम्यान असलेला कालावधी योग्य मानला जातो. या काळात कापसाची पेरणी करून अधिक उत्पादन घेता येते, परंतु जास्त उष्णतेमुळे कपाशीची झाडे करपून जावू लागतात. मात्र असे असले तरी आगात पेरणी करून कपाशीच्या रोपाला उन्हाच्या तडाख्यापासून वाचवता येते. कारण की, जेव्हा उष्णतेचा प्रकोप सुरू होईल तेव्हा कपाशीचे पीक चांगले तयार झालेले असते आणि त्याच वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन कपाशीला उष्णतेपासून वाचवता येऊ शकते. जर तुमच्या वालुकामय माती असेल तर आपण कापसाची पेरणी लवकर म्हणजेच आगात करावी. यातून तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.
कापसासाठी पूर्वमशागत
कापसाच्या पिकातून चांगल्या उत्पन्नासाठी शेताची चांगली तयारी करणे अर्थात पूर्वमशागत व्यवस्थित रित्या करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, सर्व प्रकारच्या जमिनीत कापूस लागवड करता येते, परंतु रेताड मृदा असलेली शेतजमीन कापसाच्या शेतीसाठी योग्य नाही. काळी मृदा, गाळाची मृदा असलेली शेतजमीन कापसाच्या शेतीसाठी सर्वोत्तम मानली जाते. कापूस लागवडीसाठी शेताची सुमारे 2 ते 3 वेळा खोल नांगरणी करावी लागते. पहिली नांगरणी माती फिरवणाऱ्या नांगराच्या साहाय्याने करावी व नंतर दुसरी नांगरणी हॅरोने करावी. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी प्रत्येक नांगरणीनंतर खत टाकावे.
कपाशीची पेरणी कशी करावी
कपाशीची पेरणी नेहमी बियाणे-खत एकत्रित ड्रिल किंवा प्लांटरच्या मदतीने करावी किंवा तुम्ही रो ड्रिलच्या मदतीने देखील करू शकता. बियाणे सुमारे 4 ते 5 सेमी खोल पेरले पाहिजे आणि ओळीतील अंतर सुमारे 68 सेमी असावे. याशिवाय रोपापासून रोपापर्यंत 30 सें.मी. अंतर असावे. त्याचप्रमाणे संकरित व बीटी कपाशीची पेरणीसाठी सलग 68 सेंमी आणि झाडांमधील अंतर 60 सें.मी. राहू द्यावे. जसं की आम्ही आपणास आधी सांगितले की, कापूस पेरणीसाठी 15 एप्रिल ते 15 मे ही योग्य वेळ आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना कापसाची लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या शेतात कपाशीची पेरणी साठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी. जेणेकरून वाढत्या उन्हापासून नुकसान होणार नाही आणि अधिक नफा मिळेल.
Published on: 20 April 2022, 05:44 IST