डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील पावसाची रिपरिप बऱ्याच ठिकाणी नोंदवली गेली. दिवसाचे किमान तापमान १३℃ च्या खाली नोंदवले गेले. आंबे बहराची फुले एक सारखी येण्यासाठी दिवसाचे किमान तापमान १३℃ च्या वर तसेच कमाल तापमान २८ ℃ च्या वर असणे आवश्यक आहे. डिसेंबर अखेर किमान तापमान १३℃ च्या खाली जाणे अपेक्षित असते. पण पावसामुळे बऱ्याच ठिकाणी किमान तापमान १३℃ च्या आसपास पण कमाल तापमान मात्र २५-२८℃ दरम्यान नोंदवले गेले. यवतमाळ-अकोला जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 13 ℃ च्यावर नोंदले गेले तसेच कमाल तापमान साधारणपणे २५-२९ ℃ च्या दरम्यान नोंदवले गेले.
या जिल्ह्यांमध्ये लिंबूवर्गीय फळबागांना आंबेबहरासाठी आता पाणी देणे चालू ठेवण्यास हरकत नाही.अशा बगीच्यात जी ए-३ १ ग्रॅम १ किलो युरिया सोबत मिसळून फवारणी करणे. नागपूर-अमरावती जिल्ह्यातील बगीच्यांमध्ये बऱ्याच बगीच्यात आंबेबहराची फुले येण्यासाठी अजूनही पोषक हवामान नाही. आंबे बहर घेणाऱ्या बऱ्याच संत्रा-मोसंबी बागायतदारांनी अशा परीस्थितीत ज्या बगीच्यांमध्ये मागील दोन आठवड्यात सीसीसीची फवारणी झाल्यानंतर पाऊस आला असेल त्यांनी २ मिलीलिटर (हलक्या जमिनीत १.५ मिली लिटर) क्लोरमिक्वट क्लोराईड (सीसीसी) प्रतिलिटर पाण्यात मिसळून पुन्हा फवारणी करावी.
सीसीसी ऐवजी पॅक्लोब्युट्रॅझॉल ६ मीली प्रति झाड (२०-२५% तीव्रतेचे असल्यास ३०-२५ मीली प्रतीझाड) या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून आळ्यात मातीद्वारे द्यावे. फवारणी करायची असल्यास ५ मिली प्रतीलिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.याफवारणी सोबत कुठल्याही अन्नद्रव्यांचा किंवा संजीवकाचा समावेश करू नये. आवश्यक असल्यास बुरशीनाशक/मिसळून वापरण्यास हरकत नाही.२० जानेवारी नंतर बगीच्याला पाणी देणे.संत्रा-मोसंबी बागेत मृग बहर पिकाचे नियोजन डिसेंबर अखेर झालेल्या पावसामुळे मृगबहर असलेल्या बगीच्यांमध्ये बुरशीजन्य फळगळ/तपकिरी कूज येऊ शकते तेंव्हा २.५ अॅलिएट १ ग्रॅम कारबेंडॅझिम सोबत मिसळून फवारणी करावी.
फळांचा आकार व गोडी वाढवण्यासाठी जीए-३ १.५ ग्रॅम+यूरीया १.५ किलोग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणे. पंधरा दिवसांनी २-४-डी 05234 1.5 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणे.लिंबाच्या हस्त-आंबे बहराचे व्यवस्थापन ज्या बगीच्यात हस्त बहराची फुले आलेली आहेत अशा बगीच्यात जी ए-३ १ ग्रॅम १ किलो युरिया सोबत मिसळून फवारणी करणे. प्रलंबित पावसाळ्यामुळे लिंबाच्या आंबेबहरावर ही परिणाम होत आहे.बऱ्याच बगीच्यात ताण बसलेला नाही. तरी सर्व लिबू बागायतदारांनी क्लोरमिक्वट क्लोराईड किंवा पॅक्लोब्युट्रॅझॉल या वाढनिरोधकाची पुन्हा एक फवारणी करावी. २० जानेवारी नंतर बगीच्याला पाणी देणे.
Published on: 18 June 2022, 08:00 IST