Agripedia

पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड करावी. कमी कालावधीत या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळते.

Updated on 17 October, 2021 7:27 PM IST

पालेभाज्या लागवडीसाठी पुरेशा पाण्याची आवश्‍यकता आहे. पालेभाज्यांची लागवड थोडी थोडी, पण सातत्याने करावी. त्यामुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार पालेभाज्यांचा पुरवठा करता येतो.

पालक, कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांची लागवड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने करावी.

1) पालेभाज्या लागवडीसाठी मध्यम, कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी. सेंद्रिय खतांचे भरपूर प्रमाण आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

2) जमिनीची मशागत करून चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या उतारानुसार 3x2 मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत.

3) सपाट वाफ्यामध्ये 20 ते 30 सें.मी. अंतरावर ओळी पाडून त्यामध्ये बी पेरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कॅप्टनची बीजप्रक्रिया करावी. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बियाणे ओळीत पेरल्यास खुरपणी करणे सोपे होते. तसेच काढणी करणे सोपे जाते.

4) भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने हप्त्याहप्त्याने पेरणी करावी.

5) पेरणी अगोदर धने रगडून त्याचे दोन भाग करावेत. 

पेरणीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजवून नंतर चांगले सुकवून पेरणी केल्यास उगवण लवकर (90 दिवसांत) होते.

6) मेथी पेरणीनंतर चार दिवसांत उगवते. तर कसूरी मेथीची उगवण होण्यास 6 ते 7 दिवस लागतात.

7) राजगिऱ्याचे बी वाळलेली माती किंवा बारीक वाळू मिसळून पेरणी करावी. उगवणीनंतर आवश्‍यकतेप्रमाणे खुरपणी करून, तण काढून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

8) पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सें.मी. उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सें.मी. भाग ठेवून

ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा.

9) मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांची काढणी पाने कोवळी लुसलुशीत असतानाच करावी. 

 

-विनोद धोंगडे नैनपुर

English Summary: Planning of leafy vegetable cultivation (1)
Published on: 17 October 2021, 07:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)