Agripedia

नमस्कार मंडळीआपन शेतकरी वर्ग काही लहान लहान गोष्टीला फार गांभीर्याने घेतच नाही.

Updated on 03 May, 2022 2:57 PM IST

शेती कोरडवाहू असो की बागायती असो सर्वाचा प्रश्न सारखाच की माती निकस झाले कि काय? मि आता रोखठोक बोलतो आपल्याला सवय झाली आहे की आपन बाईक मधले पेट्रोल संपेपर्यंत आपन तिला चालवतो आहे तसंच आपन आपल्या जमिनी सोबत केलें आहे सुपिकता संपेपर्यंत आपन उत्पादन घेत असतो.मला सांगा हे कीती योग्य आहे आपन फक्त कामापुरते उपाय योजना करण्याची सवय झालेली आहे . आपल्याला फुकटाच उत्पादन पाहिजे मग त्यानंतर परीनाम काही होवो काहीच लेणं देणं नाही. 

आपले शेतकरी मित्र फक्त फायद्या साठी भविष्यातील संकटांना स्वतः हून आमंत्रण देत आहे कारन त्यामागचे कारण आपले अज्ञान किंवा शेती बद्दल च अपूर्ण ज्ञान हे आहे. मित्रहो मातीच्या आरोग्यावर जर आपण भर दिला तर भविष्याचा उद्देश ठेवून शेती च नियोजन करता येऊ शकते ! मातीच्या आतली सुपिकता हे यशस्वी शेतीचे रहस्य आहे.आपन शेती मधेआधुनिक तंत्राचा वापर जरूर करा पण त्यांच्या मर्यादा ओळखा कोणत्याही फायदा सांगताना त्यांची मर्यादा सांगणे आवश्यक आहे कारन फायदा करुण घेणारे कमी आणि दुष्परिणाम करुण घेणारे जास्त असतात.

आज शेतकरी वर्ग काही गोष्टी ने निराश व हतबल होत चालला आहे शेती मधल्या मातीच त्याच बरोबर आपल्या पिकाचं तंत्र समजून घेतच नाही.आपल्या विचार बदलायला हवा!माझा शेतकरी हा एक दाना माती मधे पेरून हजारो दाने निर्माण करनारा आहे पण त्याचं रूपांतर उत्पादन घेण्यासाठी तो कधी कधी कमजोर पडतो. फक्त आम्ही ती कशी पिकवतो ह्याचे चिंतन व्हायला हवे , त्या शेतमालाची क्वालीटी ,पौष्टीकता सुरक्षीतता आपन जपायला हवी.काही गोष्टी सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडे आहे जीवनभर जो शेती करत असेल व शेती मधे खर्च वाढल असेल तर उत्पादन खर्च जास्त होत असेल तर आपन कोठेतरी चुकीचे करत आहे.

आपल्या शेतकरी मित्रांनी एक गोष्ट शिकायला हवी आपल्याला जशी प्रत्येक गोष्टीची गरज आहे तशीच आपल्या झाडांनासुद्धा गरज आहे. त्यामुळे सतत आपण आपली अभ्यासु वृत्ती जपली पाहिजे.पण ते स्वतः अनुभव घेतील कि ते किती मोठी चूक करत आहे आपल्या हातने स्वतः चे नुकसान करून घेत आहे हे लक्षात येईल.

शेती बलवान तर शेतकरी धनवान

 

मिलिंद जि गोदे

9423361185

Mission agriculture soil information

Save the soil all together

milindgode111@gmail.com

English Summary: Plan by studying agriculture and soil
Published on: 03 May 2022, 02:57 IST