Agripedia

जुलै महिन्यात काही ठिकाणी वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे.

Updated on 09 July, 2022 5:49 PM IST

जुलै महिन्यात काही ठिकाणी वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड सुरू आहे.जून महिन्यात लागवड केलेली पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत.सद्यस्थितीत दिवस व रात्रीचे तापमान, आर्द्रता,सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी बाबी वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहेत.- झपाट्याने वाढणाऱ्या वेलांना आधाराची गरज असते, त्यासाठी वेलीला मंडप किंवा बांबूसारख्या वस्तूंचा आधार द्यावा.लागवडीखालील क्षेत्रात कमीत कमी तण राहील याची काळजी घ्यावी.

- वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मादी फुले आणि नर-फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळी (मोनोसीयस) लागतात. मादी फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी फळे जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे सुरवातीच्या अवस्थेत मादी फुले जास्त लागणे गरजेचे असते. त्यासाठी वेलीवर पुढीलप्रमाणे संजीवके फवारावीत.- पिके दोन पानांची असताना- जिबरेलीक आम्ल २५ पीपीएम (२५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी)- पिके चार पानांची असतांना नॅप्थील अॅसेटीक ॲसिड- १० पीपीएम (१० मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी)- माती परीक्षण करूनच खतमात्रा ठरवावी.

हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश याप्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी.- जमिनीचा मगदूर व वातावरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण आदी बाबींचा विचार करून पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर ठरवावे. जमीन हलकी असल्यास ३-४ दिवस,मध्यम जमिनीत ५-६ भारी जमिनीत ८-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.- शक्यतो ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिंबक सिंचन पद्धतीमुळे सर्व वेलींना समान पाणी मिळते, तणांचे प्रमाण नियंत्रित राहते तसेच कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर लागवड होते.- सध्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर नागअळीचा प्रादुर्भाव दिसून यतो. 

नागअळी - Liriomyza sativaeलक्षणे -अळी पानात शिरुन त्यावर उपजीविका करते. पानाच्या आतील भाग खाल्ल्यामुळे पेशी मृत होऊन त्याठिकाणी मोकळ्या रेषा दिसतात. पानांवरूनही त्या ठळकपणे दिसून येतात.नुकसान -प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते. उत्पादनात घट होते.नियंत्रण -फवारणी प्रतिलिटर पाणी अझाडिरेक्टीन (१०००० पीपीएम) ४ मि. लि. किंवा ट्रायझोफाॅस १.५ मि. लि.पावसाचा मोठा खंड पडल्यास वातावरणातील तापमानात वाढ होते. अशावेळी कोळी या किडीचा प्रादुर्भाव हाेतो. त्याचे नियंत्रण करावे. कोळी - Tetranychus urticae लक्षणे - किडीने रसशोषण केल्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसतात. प्रादुर्भाव तीव्र झाल्यास कीड पानातील संपूर्ण हरितद्रव्य फस्त करते. नुकसान -हरितद्रव्य खाल्ल्यामुळे पान पूर्ण पिवळे पडते व गळून पडते.नियंत्रण -फवारणी प्रतिलिटर प्रॉपरगाईट (५७ ई.सी.) १ मि.लि. 

 

अधिक माहितीकरिता संपर्क-डाॅ. एस. एम. घावडे,९६५७७२५८४४

(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

English Summary: PKs paid in July and their management
Published on: 09 July 2022, 05:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)