तर गुलाबी बोंड अळी बद्दल व त्याच्या व्यवस्थापना बद्दल आपण अधीक माहीती आज जानुन घेऊया.
गुलाबी बोंड अळी ही 'पेक्टीनोफोरा गॉसीपीएला' या नावाने जगामध्ये ओळखली जाते. भारतामधे पारंपारीक रीत्या होणाऱ्या कपाशीवर या अळीचा प्रादुर्भाव आधीपासुन असुन तो १९८० ते १९९० या दशकात प्रचंड वाढला व त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ लागले.
परंतु २००२ मधे भारतात बीटी कपाशीची लागवन सुरु झाली व त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. सन २०१४-१५ पर्यंत या अळीचा प्रादुर्भाव कमी होता पण बीटी कपाशीच्या लागवनी बरोबर काही क्षेत्रात (२०% क्षेत्रात) बीगर बीटी ची लागवन न केल्यामुळे व या अळीचे कापुस एकमात्र खाद्य पदार्थ असल्याने या अळी मध्ये बीटी कपाशीविरुद्ध प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आणि त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव सन २०१५-१६ व २०१६-१७ पासुन खुप प्रमाणात वाढु लागला आणि ले प्रादुर्भाव २०१७-१८ मध्ये अतिशय नुकसानदेही ठरले.
या अळीच्या प्रादुर्भावाची ओळख
ही अळी अंडीतुन बाहेर निघाल्यावर प्रथम पांढऱ्या रंगाची असते व जशी ती मोठी होते तशी ती गुलाबी रंगाची होऊ लागते व बोंडात शिरते, यामुळे तीला गुलाबी बोंड अळी असे म्हणतात.
प्रादुर्भाव झालेली फुले डोकमळी होतात म्हणजे अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारखी दिसतात. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ओळखायचा असल्यास जेव्हा आपला कापूस हा फुलीय टप्प्यात असतो तेव्हा हिरव्या बोंडापैकी कोणतेही २० बोंड प्रति एकर घ्यायचे व त्यांना फोड़ून बघायच, जर त्या २० पैकी १-२ बोंड या अळीच्या प्रादुर्भावात आले असतील तर तुमच्या शेताला या अळी मुळे भारी नुकसान होऊ शकते आणि ते टाळन्या करीता तुम्हाला लगेच व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण करायची अजून एक पद्धत म्हणजेच फेरोमोन सापळे यालाच इंग्रजीमध्ये फेरोमोन ट्रैप असेही म्हणतात. प्रति एकर १-२ फेरोमोन सापळे लावावेत व त्यातील पतंगे दररोज मोजावी व मारावेत. जर आपल्या सापळ्यात सतत ३ दिवस ८ किंवा त्यापेक्षा जास्त पतंग आढळून आल्यास समजुन जावे की आपल्याला व्यवस्थापनाची गरज आहे.
या अळ्या रूई मधुन छिद्र करतात व त्यातील सरकी खाता ज्यामुळे सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते व बियानांच्या उगवणशक्तीवर पण प्रभाव पडतो आणि कपाशीची प्रत खलावते.
गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन
ही कीड एकदा बोंडामधे शिरली की मग रासायनीक किटकनाशका द्वारेही पुरेसे नियंत्रण मिळत नाही. त्यामुळे याच्या साठी आपल्याला एकीकृत किड व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. गुलाबी बोंड अळीचे कापूस हे एकमात्र खाद्य पदार्थ असल्यामुळे खोडवा पिक घेवू नवे व पिकांची फेरपालट करावी जेनेकरुण त्या कीड ला वर्षभर खाद्य उपलब्ध राहणार नाही व ती मरेल. जमीनीत लपलेल्या कोषांना बाहेर काढण्यासाठी खोल नांगरणी करावी, पेरणी थोडी उशीरा (जुन च्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात) करावी व बीटी कपाशीच्या लागवणीबरोबर कमीतकमी २०% जमीनीवर बिगर बीटी कपाशीची लागवण करावी.
आपल्या मित्र किटकांपैकी एक किटक ज्याला आपण ट्रायकोग्रामा चिलोनिस म्हणतो ती या अडीला अंडी अवस्थेतच नष्ट करते, आपल्याला ती घ्यावयाची असल्यास ट्रायकोकार्ड या स्वरुपात उपलब्ध राहते, ते आपण प्रति एकरी ३ कार्ड या प्रमाणे कपाशीला पात्या आल्यानंतर ७-८ वेळा दर १० दिवसानंतर लावावे. आपल्या शेतातील डोमकळ्या मजुरांच्या सहाय्याने नष्ट कराव्या व वनस्पती जन्य किंवा जैविक रसायनांचे उपयोग करावे त्यामध्ये प्रामुख्याने ५% निंबोळी अर्क, आझाडीरेक्टीन यांची फवारणी करावी.
आधी सांगीतल्या प्रमाणे फेरोमोन सापळ्याद्वारे बोंड अळीचे सर्वेक्षण करत रहावे तसेच ५-१०% किंबहुन जास्त नुकसान आढळल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. पहिल्या फवारणीमधे क्विनलफौस (२०% ए.एफ) तर दुसऱ्या फवारणीमधे फेनप्रोपैथीन (१०% किंवा ३०% इ. सी.) किंवा सायपरमेथरीन (१०% इ.सी.) यांचा वापर करावा.
विविध कृषि महाविद्यालयांच्या व शेतकर्यांच्या मदतीने आपण या अळीचे प्रमाण खुप कमी केले आहे. परंतु काही भागात अजुनही या अळीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या करीता शेतकर्यांनी या पासुन अवगत करण्यासाठी व त्यांची मदत करण्यासाठी कृषिशास्त्र समुह नेहमी तत्पर आहे.
भावेश अग्रवाल
एम.एस. सी. विद्यार्थी
कृषि शास्त्र समुह महाराष्ट्र
Published on: 08 November 2021, 06:16 IST