Agripedia

जग भरातील अनेक शास्त्रज्ञांनी स्फुरद विरघळवणारे जीवाणू या विषयावर अनेक तर्हाने संशोधन केले आहे. बँसिलस स्पे. आणि सुडोमोनास स्पे. या दोन जीवाणूंना सर्वाधिक स्फुरद विरघळवण्याचा मान मिळतो.

Updated on 29 December, 2021 3:19 PM IST

बॅसिलस स्पे. हि एन्डोस्पोअर्स तयार करणारी जात असल्याने हानीकारक परिस्थितीत दिर्घकाळ तग धरुन राहु शकते. या दोन्ही जीवाणूंचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपणास आढळुन येते कि, तुलनात्मक दृष्ट्या जास्त आणि कमी अशा दोन्ही तापमानात तग धरु शकणारे, आणि एन्डोस्पोअर्स तयार करु शकणारे बॅसिलस मेगाथेरियम चे जीवाणू हे सुडोमोनास फ्लुरोसन्स पेक्षा रहिवासासाठी लागणाऱ्या गरजेत जरा उजवे ठरतात, कारण जमिनीतील सतत बदलत राहणाऱ्या परिस्थितीत ते जास्त काळ तग धरुन राह शकतात.       

जीवाणू आणि रसायन हे म्हणजे परस्पर विरोधी असे दोन पैलु असुन त्यांचा एकत्र किंवा लागोपाठचा वापर हा जीवाणूंसाठी अत्यंत हानीकारक असा असतो, हि आपली अनेक वर्षापासुनची समजुत आहे. अनेक शेतकरी जैविक खतांचा वापर केवळ या एकाच कारणासाठी टाळत आलेले आहेत. या मुळे, जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरले जावुन किंवा बाजारात तुलनात्मक दृष्ट्या महाग मिळणाऱ्या विद्राव्य खतांच्या वापराकडेच जास्त कल दिसुन येतो. जीवाणू किंवा जैविक खते हि पिकांस अन्नद्रव्य उपलब्ध करुन देण्यासोबतच जमिनीत वर्षानुवर्ष एकाच प्रकारच्या घटकाचे (म्हणजेच अन्नद्रव्याचे) साचुन राहणे देखिल कमी करत असतात, शिवाय जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर देखिल सकारात्मक बदल घडवुन आणत असतात. त्यामुळे त्यांचे शेती पिकांतील महत्व हे हंगामी आणि दुरगामी असे दोन्ही प्रकारचे असते.

विविध ठिकाणी विविध प्रकारच्या जीवाणूंवर संशोधन झालेले आहे. या ठिकाणी सर्वच माहीती विस्तृत स्वरुपात देता येणे शक्य नाही, 

तथापी, त्या सर्वच प्रयोगांच्या अंती इतकेच लक्षात येते कि, ज्यांना आपण रासायनिक म्हणुन ओळखतो, ते नैसर्गिक अशा स्रोतांपासुनच तयार केलेले असतात. मात्र नैसर्गिक स्वरुपात असतांना त्यामधिल एखादा विशिष्ट घटक हा कमी प्रमाणात असतो. अशा नैसर्गिक घटकांवर प्रक्रिया करुन त्यातील त्या ठराविक घटकाचे प्रमाण वाढविले जाते. उदा. निसर्गात रॉक फॉस्फेट च्या खाणी उपलब्ध आहेत, हा रॉक फॉस्फेट जरी पिकांस दिला तरी तो पिकास उपलब्ध होतोच आणि तसे नैसर्गिक रित्या होण्यास फार मोठा कालावधी निघुन जावा लागतो, मात्र या रॉक फॉस्फेट सोबत जर अतिशय जास्त प्रमाणात स्फुरद विरघळवणारे जीवाणू वापरले तर मात्र हाच रॉक फॉस्फेट पिकास त्वरित उपलब्ध होतो. शिवाय पिकास सतत फॉस्फोरसचा पुरवठा करत राहतो. स्फुरद विरघळवणारे जीवाणू सेंद्रिय आम्ल स्रवतात ज्यामुळे हे शक्य होते.

जैविक खतांतुन उपलब्ध होणारी खते हि फार कालावधीनंतर पिकास मिळतात असा देखिल एक समज आहे, पाकिस्तानातील सिंध प्रांतात जे संशोधन झाले, त्यातुन हे स्पष्ट झाले आहे कि, जीवाणू स्थिर झालेला स्फुरद हा ४८ तासातच पिकास उपलब्ध करुन देतात. ह्या अशा जीवाणूंच्या वापरातुन जर ३ ते ५ दिवसांत पिकावर स्फुरद उपलब्ध झाल्याने सकारात्मक परिणाम दिसत नसतिल तर एकतर त्या जीवाणूंच्या मिश्रणात भेसळ असेल किंवा त्यांची संख्या जास्त प्रमाणात नसल्याने ते पिकास पुरेल ईतका स्फुरद विरघळवु शकत नसतिल.

रासायनिक खतांतील स्फुरद हा रॉक फॉस्फेट वर अती तीव्र अशा सल्फ्युरिक असिड ची प्रक्रिया करुन बनवले जाते, बघा ह्या ठिकाणी देखिल ऑसिड ची गरज भासतेच, केवळ फरक ईतकाच की, स्फुरद विरघळवणारे जीवाणू सेंद्रिय आम्ल नैसर्गिक रित्या स्रवतात तर ह्या ठिकाणी कृत्रिम रित्या निर्मित आम्ल वापरले जाते. अशा प्रकारे सल्फ्युरिक अॅसिड ची रॉक फॉस्फेट वर प्रक्रिया केल्यानंतर रॉक फॉस्फेट मधिल काही घटक हा पाण्यात विद्राव्य अशा स्वरुपात रुपांतरीत होतो, तर काही भाग हा अॅसिड मधे विद्राव्य होईल अशा स्वरुपात रुपांतरीत होतो. आपण जर सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डि ए पी ची गोणी काळजीपुर्वक बघितली असेल तर त्यावर पाण्यात विरघळणारे आणि अॅसिड मध्ये विरघळणारे स्फुरद किती आहे अशी स्फुरदची वेगवेगळी टक्केवारी छापलेली दिसुन येते. ज्यावेळेस असे खत शेतात टाकले जाते त्यावेळेस त्यातील पाण्यात विरघळणारा स्फुरद पिकांस उपलब्ध होतो, आणि जर शेतात स्फुरद विरघळणारे जीवाणू असतिल तर ते उर्वरित असिड सोल्युबल फॉस्फोरस देखिल पिकांस उपलब्ध करुन देण्याचे काम करतात.             

ज्यावेळेस जीवाणूंच्या संवर्धनासाठी बाहेरुन त्यांचा पुरवठा म्हणा अथवा सेंद्रिय पदार्थ म्हणा यांचा पुरवठा केला जात नाही 

त्यावेळेस त्यांची संख्या कमी होते आणि ऑसिड सोल्युबल फॉस्फोरस जमिनीत जमा होत राहतो, शिवाय कॅल्शियम, फेरस, अॅल्युमिनियम यांच्या सोबत त्याचे पाण्यात अविद्राव्य असे संयुग बनत राहते, हे संयुग बनुन जमिनीतील योग्य असे मुलद्रव्यांचे गुणोत्तर बिघडते आणि जमिनीचा पोत बिघडतो, जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया मंदावते. खतांतुन, पाण्यातुन जमिनीत टाकले जाणारे विविध घटक जमिनीच्या वरिल थरात जमा होत राहतात.

English Summary: Phosphorus dissolved microbs and understand
Published on: 29 December 2021, 03:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)