Agripedia

पिकाची वाढ होत असतांना, त्या पिकाच्या शारिरिक वाढीत जी उर्जा गरजेची ती उर्जा स्फुरद किंवा फॉस्फोरस पासुन पिकास मिळत असते.

Updated on 28 December, 2021 2:58 PM IST

पिकाच्या मुळांची वाढ, मुळांव्दारा अन्नद्रव्याचे शोषण, पानांची निर्मिती, फुलांची निर्मिती ह्या सर्व कार्यात फॉस्फोरस ने तयार केलेली उर्जा पिकास जोमदार, निरोगी वाढ मिळण्यासाठी उपयोगी पडत असते. फळपिकात ह्या अन्नद्रव्याची गरज हि तृणधान्ये, कडधान्ये, व इतर भाजीपाला पिकांच्या पेक्षा ही बरिच कमी असते. पिकास संथ रितिने उपलब्धता, जमिनीतील कॅल्शियम, फेरस, अॅल्युमिनियम या सारख्या घटकांसोबत स्थिरिकरण होणे आणि मातीचा सामु जास्त किंवा कमी जरी असला तरी देखिल फॉस्फोरस च्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणींमुळे हे अन्नद्रव्य सध्या विषेश उर्जा खर्च करावयास लावते आहे. अर्थात हि उर्जा कृषी सल्लागार, शास्रज्ञ, आणि शेतकरी यांचीच जास्त होते आहे.

आपण आताच बघितले की, पिकातील उर्जा निर्मितीतील एक अविभाज्य घटक म्हणजचे फॉस्फोरस (स्फुरद)आहे. नत्राच्या वापरातुन जे हरितलवक तयार झाले तथे होणाऱ्या संश्लेषण क्रियेत फॉस्फोरसच्या वापरातुनच उर्जा संपन्न अशा अडीनोसाईन ट्राय फॉस्फेट (ATP) ची निर्मिती केली जाते. या क्रियेत फॉस्फोरस हा गरजेचा असतो. पिकाच्या पेशीत ज्या मायटोकॉन्ड्रिया असतात, आणि हरितलवक असते त्यात देखिल काही प्रमाणात ए टि पी ह्या उर्जा संपन्न पदार्थाची निर्मिती ही अविरत सुरु असते. फॉस्फोरस पासुन तयार झालेल्या ए टि पी वर प्रक्रिया करुन त्यापासुन विविध कबोंदके, एन्झाईम्स, अॅमिनो असिडस्, संप्रेरके, आणि विशेष म्हणजे नत्र, पालाश, काही प्रमाणात कॅल्शियम वै. सारख्या अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी जी उर्जा लागते ती देखिल तयार होत असतो. 

शिवाय फॉस्फोरस (स्फुरद) हा उर्जा निर्मिती भरपुर प्रमाणात करित असल्याने त्या ऊर्जेच्या वापरातुन पिक भरपुर प्रमाणात फुलधारणा करु शकते. पिकाचे देखिल स्वतःचे एक अर्थशास्त्र असते, ज्यावेळेस पिकात उर्जा निर्मिती कमी प्रमाणात होत असते त्यावेळेस तयार होणारी कर्बोदके म्हणजेच कार्बन देखिल कमी असतो. आपण ज्याला सी एन रेशो किंवा कार्बन नायट्रोजन रेशो, (कर्ब नत्र गणोत्तर) असे म्हणतो त्यातील कर्ब हा फॉस्फोरस ची कमतरता असेल तर, कमी प्रमाणात तयार होतो ज्यामुळे पिकातील नत्राचे प्रमाण वाढते. हा सी एन रेशो बिघडला की, पिक फाजील वाढच जास्त प्रमाणात करुन फूलोरा निर्मितीत कमी पडते. पिकात भरपुर प्रमाणात उर्जा निर्मिती होवून भरपुर प्रमाणात फुले येण्याकरिता फॉस्फोरस हा अत्यंत गरजेचा असा दुवा आहे.

फॉस्फोरस कमतरतेमुळे पिकांच्या मुळांच्या वाढीवर परिणाम होतो. पिकांस कमी प्रमाणात फुले लागतात, तसेच ज्या फळात बी असते अशा फळांचा आकार लहान राहतो, व फळ वेळेवर परिपक्व होत नाही. कणसातील दाणे भरत नाहीत. पानांचा रंग जांभळा निळसर होतो. पिक फॉस्फोरस (स्फुरद) हा ऑर्थोफॉस्फेट (H2PO4, HPO^--) च्या स्वरुपात शोषुन घेत असते . ज्या जमिनीचा सामु जास्त असतो त्या जमिनीत HPO^-- च्या स्वरुपात जास्त प्रमाणात शोषण होते.  

      ज्या मातीचा सामु हा ७.५ पेक्षा जास्त असतो अशा मातीत फॉस्फोरस चे कॅल्शियम सोबत स्थिरिकरण होते. फॉस्फोरस कॅल्शियम सोबत स्थिर झाल्याने पिकास फॉस्फोरसची आणि कॅल्शियमची देखिल कमतरता जाणवते. यात एक बाब मात्र थोडी दिलासा दायक आहे कि, फॉस्फोरस ज्यावेळेस कॅल्शियम सोबत स्थिर होत असतो त्यावेळेस त्यापासुन फॉस्फोरस हा सहजरित्या वेगळा देखिल होण्याची संधी निर्माण करत असतो. बाहेरुन काही प्रयत्न केल्यास जमिनीतील स्थिर फॉस्फोरस हा पिकास मिळु शकतो.

ज्या मातीचा सामु हा कमी असतो त्या मातीत फॉस्फोरस हा अॅल्युमिनीयम व फार कमी प्रमाणात फेरस सोबत स्थिर होतो. फेरस आणि अॅल्युमिनियम सोबतचे स्थिरिकरण हे जरा जास्त घट्ट आणि लवकर मुक्त होणार नाही अशा प्रकारचे असते. 

 ज्या मातीचा सामु हा ५ पेक्षा कमी असतो अशा मातीत फेरस किंवा अॅल्युमिनियम सोबत स्फुरद चे स्थिरकरण होत असते. जमिनीत फॉस्फोरस फार कमी म्हणजेच 0.001 ते 1 मिलीग्रॅम प्रती लि. इतक्या प्रमाणात विद्राव्य स्वरुपात असतो.

पिक फॉस्फोरस हा डिफ्युजन पध्दतीने शोषुन घेत असते. डिफ्युजन पध्दती म्हणजे जास्त प्रमाणाकडुन कमी प्रमाण असलेल्या भागाकडे वहन होणे. यामुळे पिक केवळ मुळांच्या परिसरातील फॉस्फोरस शोषुन घेवु शकते. ज्यामुळे कमी प्रमाणात मुळांची वाढ असलेल्या पिकात फाॅस्फोरसचे सहाजीकच कमी प्रमाणात शोषण होते.  

          जमिनीत स्फुरद युक्त खत टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळते, आणि त्या खतातील पाण्यात विरघळणारे स्फुरद जे प्रमाण दिलेले आहे ते विरघळुन त्या खताच्या कणांपासुन अत्यंत म्हणजे 0.002 सेमी प्रती दिवस या गतीने दुर जाते, संथ गती मुळे हे स्फुरद जमिनीतील कॅल्शियम, अॅल्युमिनियम, फेरस सोबत स्थिर होण्याची शक्यता वाढते.

जमिन कोणत्याही प्रकारची असली तरी देखिल त्यात फॉस्फोरस चे स्थिरिकरण हे होतच असते. शिवाय सध्या विद्राव्य खतांतुन तसेच फॉस्फोरिक अॅसिड च्या माध्यमातुन देखिल फॉस्फोरसची उपलब्धता वाढावी म्हणुन प्रयत्न केले जात आहेत. मात्र फॉस्फोरस हा कोणत्याही स्वरुपातील असला तरी देखिल त्याची स्थिरिकरणाची मात्रा ही कमी अधिक प्रमाणात सारखीच असते. ह्या सारख्या तात्पुरत्या उपाययोजनातुन तात्काळ परिणाम जरी दिसत असले, तरी देखिल ह्यामुळे होणारे दुरगामी परिणाम हे चिंताजनकच असतील. फॉस्फोरिक ऑॅसिड दिल्यानंतर पिकाची वाढ, पानांचा रंग, पानांचा आकार ह्यात दिसुन येणारे सकारात्मक बदल हे सुयोग्य रित्या फॉस्फोरस युक्त विद्राव्य खते वापरुन देखिल दिसणार आहेतच. फॉस्फोरसची पिकास उपलब्धता व्हावी म्हणुन केले जाणारे हे रासायनिक आणि अघोरी प्रयत्न मुळ समस्येला तसेच ठेवतात. फॉस्फोरस च्या स्थिरिकरणामुळे जमिनीतील मातीच्या कणांच्या भौतिक रचनेत, माती कडक होणे, पाणी मुरण्याचा वेग कमी असणे ह्या आणि अशाच ईतर समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा रासायनिक पदार्थांचा वापर करुन मिळत नाही.

फॉस्फोरिक अॅसिड, सल्फ्युरिक ऑसिड (मातीचा सामु करुन अन्नद्रव्ये उपल्बध करुन देण्यासाठी याचा वापर केला जातो), विद्राव्य खते यांचा वापर हा एक प्रकारची लक्षणांवर केलेली उपाययोजना आहे, मुळ रोग हा वेगळाच आहे. हे म्हणजे अस आहे कि, अपघातात पायाला जखम झाली आणि पाय फ्रॅक्चर देखिल झाला, मात्र एक्स रे काढण्याची सुविधा नसल्या कारणाने हे कळालेच नाही की, पाय आतुन मोडलेला आहे. उपचार करणाऱ्यांनी पायाच्या वरिल जखमेवर ईलाज तर केला मात्र तरी पाय काही चालु देत नाही. निसर्गाशी समतोल साधुन जर आपण कार्य करु शकलो तर निव्वळ फॉस्फोरस उपलब्धता वाढणार नाही तर जमिनीतील कॅल्शियम चा देखिल समतोल साधला जावुन, जमिन भुसभुशीत होणे, पाण्याचा योग्य निचरा होणे आणि जमिनीची थकवा जावुन ती पुन्हा नव्या जोमाने पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी सज्ज होण्यास नक्कीच मदत होईल. फॉस्फोरस आणि त्यापासुन निर्माण होणाऱ्या विविध समस्या नैसर्गिक साधनांनी सोडविण्यात सर्वाधिक महत्वाची भुमिका निसर्गात आढलुन येणारे स्फुरद विरघळवणारे जीवाणू करत असतात. ज्या मातीत कॅल्शियम चे प्रमाण जास्त आहे, अशा मातीत कॅल्शियम चे स्फुरद सोबत स्थिरिकरण होवुन मातीच्या भौतिक गुणधर्मात जे बदल होतात ते देखिल दूर करण्याचे कार्य हे जीवाणू करतात. रासायनिक उत्पादनांचा वापर करुन केवळ पिकाचा विचार करुन स्फुरद उपलब्धता तात्पुरती वाढते, मात्र मातीचे गुणधर्म हे कायमस्वरुपी खराबच होत जातात. मातीच्या करणांना सूयोग्य पध्दतीने धरुन ठेवुन मातीची जडणघडण योग्य राखण्यात कॅल्शियम फार मोठी भुमिका पार पाडत असते, हेच कॅल्शियम स्फुरद सोबत स्थिर होण्याची क्रिया जर थांबवता आली तर मातीच्या गुणधर्मात आणि त्यामुळे सर्वच समस्यांवर विजय मिळवता येणार आहे.

English Summary: Phosphorus dissolved microbs and plants
Published on: 28 December 2021, 02:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)