Agripedia

आयात : उत्पादन वाढू लागल्याने खतांची आयात बरीच कमी होत आहे. १९६८-६९ मध्ये रु. १४० कोटीची, १९६९-७० मध्ये रु. १३९ कोटीची तयार खते आयात करण्यात आली. पोटॅशयुक्त खते आयातच करावी लागतात.

Updated on 15 January, 2022 3:51 PM IST

आयात : उत्पादन वाढू लागल्याने खतांची आयात बरीच कमी होत आहे. १९६८-६९ मध्ये रु. १४० कोटीची, १९६९-७० मध्ये रु. १३९ कोटीची तयार खते आयात करण्यात आली. पोटॅशयुक्त खते आयातच करावी लागतात.

कोष्टक आयात होणाऱ्या खतांची आकडेवारी (१,००० टनांत) वर्षे नायट्रोजनयुक्त फॉस्फरसयुक्त पोटॅशयुक्त एकूण १९६०-६१

संशोधन : फर्टिलायझर ॲसोसिएशन ऑफ इंडिया या दिल्ली येथील संस्थेत खत उद्योगधंद्याच्या विविध समस्यांवर संशोधन करण्यात येते.

संस्थेतर्फे गट चर्चा, भाषणे व संशोधनात्मक प्रबंधांची प्रसिद्धी आयोजित करण्यात येतात. फर्टिलायझर न्यूज हे मासिक या संस्थेतर्फे प्रसिद्ध केले जाते.

द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया : सिंद्री फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि. व हिंदुस्थान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., नानगल या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून १९६१ मध्ये फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी क्षेत्रातील कंपनी स्थापन करण्यात आली. या कॉर्पोरेशनच्या सिंद्री, नानगल, तुर्भे, नामरूप (आसाम) आणि गोरखपूर येथील कारखान्यांत खतनिर्मिती होत आहे. दुर्गापूर व बरौनी येथील कारखाने सुरू व्हावयाचे आहेत. नामरूप, सिंद्री, तुर्भे व गोरखपूर

येथील कारखान्यांची वाढ व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. रामगुंडम, तालचेर व कोर्बा येथे कोळशापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करणारे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. सर्व कारखान्यांची एकूण उत्पादनक्षमता ४२१ हजार टनांपासून २,९७१ हजार टनांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. ह्या कारखान्यांत एकूण उत्पादनापैकी ३२% नायट्रोजनयुक्त खते तयार होतात.

तयार झालेल्या खतांचे वाटप व विक्री करण्यासाठी पूर्व, उत्तर व दक्षिण-पश्चिम असे तीन विभाग करण्यात आले आहेत.

या संस्थेतर्फे खतवापराची प्रात्यक्षिके करून दाखविली जातात व जमिनींचे विश्लेषण करून दिले जाते. तसेच सिंद्री येथे संस्थेची संशोधन शाखा असून तेथे खतांविषयीच्या विविध प्रश्नांसंबंधी संशोधन केले जाते. तसेच तेथे प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात आलेली आहे.

 

शेतकरी मित्र

विजय हि.भुतेकर सवणा

9689331988

English Summary: Phosphate fertilizer use decrease
Published on: 15 January 2022, 03:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)