सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये 40 टक्के प्रथिने आणि 19 टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 58 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ 60 टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे 5 दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत. कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. परंतु सोयाबीन वरील विविध किडींमुळे उत्पादनात घट येताना दिसते आहे, सोयाबीन पिकातील विविध किडींची ओळख व त्यावर नियंत्रण कशाप्रकारे करावे हे आपण या लेखात पाहूया.
तंबाखुवरील पाने खाणारी अळी |
|
हिरवी उंट अळी |
|
पाने गुंडाळणारी अळी |
|
केसाळ अळी |
|
खोडमाशी |
|
चक्री भुंगे |
|
व्यवस्थापन :
- पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात संपवावी.
- पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफाराशीप्रमाणे वापरावे.
- नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.
- पिकाच्या सुरुवातीच्या काळात पिक तणमुक्त ठेवावे तसेच बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा.
- पिकाच्याभोवती सापाला पिक म्हणून एरंडीची एक ओळ लावावी आणी त्यावरील तंबाखूची पाने खाणारी अळी आणी केसाळ अळी यांची अंडीपुंज वेळेत नष्ट करावीत.
- पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभारावेत.
- तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत.
- पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
- केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी पुंजक्यामध्ये अंडी घालतात व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातील एकाच पानावर बहुसंख्य असतात, अशी अंडी व अळ्या पाने अलगत तोडून किडीसह नष्ट करावीत.
- पिकांची नियमित पाहणी करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
- तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस. एल. एन. पी. व्ही. 500 एल. ई. विषाणू 2 मी. ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरीया रीलाई या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.
- हिरव्या घाटे अळीकरिता हेक्टरी किमान 5-10 कामगंध सापळे शेतात लावावेत. सापळ्यामध्ये प्रति दिन 8 ते 10 पतंग सतत 2-3 दिवस आढळल्यास नियंत्रणाचे उपाययोजना करावी.
- सोयाबीन नंतर भुईमुंगाचे पिक घेऊ नये.
- किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.
किटकनाशकांचा वापर :
- पाने गुंडाळणारी अळी:
फेनवलरेट 20 ईसी 17 मिली प्रति/१० लिटर पाणी - पाने खाणाऱ्या अळ्या आणी उंट अळी:
निंबोळी अर्क 5 टक्के
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर
एझाडीरॅकटीण (नीम ऑईल) 1500 पी. पी. एम. 25 मिली प्रति 10 लिटर पाणी.
लेखक:
संतोष सु. मादणकर, दत्ता म. बावस्कर, गणेश फ. व्यवहारे
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
Published on: 20 August 2018, 10:16 IST