मिरी हा एक प्रमुख मसाला पदार्थ आहे, याला मसाल्याचा राजा म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही कारण याविना भाजीला चव येत नाही. मिरी हे एक प्रमुख मसालापिकापैकी एक आहे. या मसाला पिकाची लागवड करून शेतकरी चांगली कमाई करू शकतात.
भारतात मिरीची लागवड हि बऱ्यापैकी पाहवयास मिळते. भारतात मिरीची लागवड हि जास्त करून केरळ मध्ये आहे. भारतातील एकूण उत्पादनाच्या 98 टक्के उत्पादन हे केवळ केरळ मध्ये आहे, यावरून मिरी लागवडीतील केरळ चे स्थान आपल्या लक्षात येईल. भारतात केरळ पाठोपाठ सर्व्यात जास्त मिरीची लागवड हि कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये केली जाते. महाराष्ट्रात देखील मिरीची लागवड हि अधोरेखित करण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील कोकण मध्ये मिरीची लागवड हि केली जाते. तसे पाहता कोंकण हे मसाला पदार्थाच्या लागवडीत आपले मोलाचे स्थान ठेवते, महाराष्ट्रात मसाला पदार्थचे उत्पादन हे केवळ कोकणातच घेतले जाते. मिरी पिकासाठी आवश्यक हवामान, पाऊस इत्यादी कोकणात आहे त्यामुळे याची लागवड हि कोकणात जास्त दिसून येते. शिवाय मिरी हे एक वेलीवर्गीय मसाला पिक आहे आणि त्याच्या वेलीला हा झाडाचा आधार लागतो आणि कोकणात नारळची झाडे भरपुर प्रमाणात आहेत त्यामुळे देखील मिरीची लागवड हि कोकणात जास्त बघायला मिळते.
हे पीक उष्ण, दमट हवामानात वाढणारे एक मसाला पिक आहे. ह्या पिकापासून अशा वातावरणात जास्त कमाई होऊ शकते. मिरी पिकाला जास्त गरम वातावरणात तसेच जास्त थंड वातावरणात वाढत नाही. त्यामुळे जिथे जास्त थंडी किंवा गरम असते त्या प्रदेशात मिरी लागवड यशस्वी होत नाही. हवेत आर्द्रता जेवढी जास्त असेल तेवढी मिरीच्या वेलीची वाढ हि चांगली होते आणि साहजिकच मग त्यापासून उत्पादन देखील जास्त मिळते. मिरीची लागवड हि मध्यम जमिनीपासून ते भारी जमिनीपर्यंत करता येऊ शकते. मिरीची लागवड हि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत देखील करता येते. थोडक्यात, ज्या हवामानात नारळ, सुपारी यांसारखी फळझाडे वाढतात किंवा वाढू शकतात.
अशा हवामाणात मिरीची लागवड करता येऊ शकते तसेच त्यापासून चांगले उत्पादन हे मिळवता येऊ शकते. इतर मसाला पिकांप्रमाणे मिरीच्या वेलीला देखील सावलीची गरज असते. म्हणुन याची लागवड आंतरपीक म्हणुन केली जाते, याची लागवड नारळासारख्या पिकासोबत केली जाते.
मिरीच्या काही सुधारित जाती
केरळ राज्यातील पेयुर मिरी संशोधन केंद्राने पेयुर-1 ते पेयुर-4 या नवीन जाती विकसित केल्या आहेत आणि त्यांचा प्रचार केला आहे. तसेच शुभंकर, श्रीकारा, पंचमी आणि पौर्णिमा ह्या वाणा नॅशनल रिसर्च सेंटर फॉर स्पाईस क्रॉप्स, कालिकत यांनी विकसित केल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने पन्नियूर संशोधन केंद्रातून पन्नियूर-1 ही जात महाराष्ट्रात आणली असून कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार जातीच्या निकषांची चाचणी करून या जातीचा कोकणात प्रसार केला जात आहे.
Published on: 14 November 2021, 07:33 IST