काळाच्या ओघात शेतकरी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष देत आहे जे की कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे निघेल यासाठी शेतकरी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. राज्यातील अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारच्या पिकांची लागवड करत असतो जे की मुबलक प्रमाणात पाणी देऊन त्यामधून शेतकरी उत्पन्न काढत असतो. बाजारात पिकाला चांगल्या प्रकारे दर मिळाला की केलेल्या कष्टाचे शेतकऱ्याला चीज मिळते. सध्या राज्यातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी भुईमूगाची लागवड केलेली आहे. जे की भुईमूग पिकामधून शेतकऱ्यांना चांगला दर भेटतो त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते मात्र यासाठी भुईमूगाला योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन तसेच भुईमूगाचे कशा प्रकारे सरंक्षण केले पाहिजे याची माहिती आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत
भुईमूग पाणी व्यवस्थापन :-
भुईमूग पिकाची पेरणी झाली की त्यास चार ते पाच दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पिकाला दहा ते बारा वेळा पाणी द्यावे . तुम्ही ज्या दिवशी भुईमूग पिकाची पेरणी करता तिथून बरोबर २५ दिवसांनी भुईमूगाला फुले येण्यास सुरुवात होते तर ४५ दिवसांनी भुईमूगाला आऱ्या सुटण्यास सुरू होते. लागवड केल्यापासून बरोबर ७० दिवसांनी भुईमूग पिकाला शेंगा येण्यास सुरुवात होते. ज्यावेळी पिकाला शेंगा येण्यास सुरुवात होते त्या दिवसामध्ये पिकाची काळजी घेणे सुरू केले पाहिजे. ज्यावेळी पिकाला आऱ्या येण्यास सुरू होते तसेच शेंगा यायला।सुरुवात होते त्यावेळी पिकाला।योग्य प्रमाणात पाणी देणे गरजेचे आहे. पिकाचा समतोल राखणे गरजेचे आहे नाहीतर जास्त भर पडल्यास उत्पादनात।घट होणार आहे.
पीक सरंक्षण :-
भुईमूग पिकाला जी पाने असतात त्या पानांवर किडीचे प्रमाण जास्त प्रमाणत असते. या पाने खाणाऱ्या अळीवर जर नियंत्रण आणायचे असेल तर त्यासाठी ४ मिली सायपरमेथ्रीन २० इ.सी किंवा १० मिली डेकामेथ्रीन २८ इ.सी किंवा २० मिली किनॉसफॉस २५ इ.सी तुम्ही १० लिटर पाण्यात मिसळावे व प्रति हेक्टरी फवारणी करावी. या दिलेल्या तीन औषधांपैकी तुम्ही कोणतेही एक प्रकारचे औषध फवारणी करू शकता. जर तांबेरा रोग पिकाला लागला असेल तर तो टाळण्यासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब १० लिटर पाण्यात मिसळा व त्याची फवारणी करा.
पीक चांगले आले की शेतकऱ्यास होतोय फायदा :-
एकदा की भुईमूग पिकाला शेंगा लागण्यास सुरुवात झाली की तिथून तुम्हाला योग्य त्या प्रकारे पाणी पुरवठा तसेच रोग व किडी यांना हटवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शेंगा लागायला सुरू झाले की तिथून पुढे पीक हातात आले असते. बाजारपेठेत सुद्धा भुईमुगाच्या शेंगाना मोठी मागणी आहेच पण त्यासोबतच त्यास दर ही चांगल्या प्रमाणत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. मात्र त्यासाठी तुम्हाला पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.
Published on: 23 February 2022, 12:24 IST