Agripedia

शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची मागणी

Updated on 17 February, 2022 6:12 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात्मक भुमिकेनंतर

शासनाकडुन जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22खरीप हंगामासाठी विमा मंजुर करण्यात आला आहे.परंतु आजही अनेक शेतकरी विमा रक्कम खात्यावर जमा झाली नसल्याने कृषी विभाग,विमा कार्यालयाचे उबरठे झिझवतांना दिसत असल्याने ७२तासाच्या आत तक्रार करुन देखील रखडलेली शेतकरी यांची विमा रक्कम अदा करण्यात यावी,तालुक्याती शेतकऱ्यांची महसुल मंडळ निहाय दिलेल्या अहवालानुसार तफावत पिक विमा रक्कम देण्यात यावी,ज्या शेतकर्यानी विमा काढलेला नाही व ज्यांनी विमा काढुन तक्रार दिली त्यांना नैसर्गीक आपत्ती अंतर्गत दिलेल्या अश्वासनानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी यासह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी सवणा येथील शेतकर्यासह

दि१४फेब्रुवरी रोजी कृषी विभाग गाठत उपविभागीय कृषी अधिकारी श्री डाबरे,तालुका कृषी अधिकारी श्री शिंदे यांच्याशी चर्चा करीत पत्राव्दारे केली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२अंतर्गत माहे सप्टेंबर मध्ये अतिवृष्टि व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याबाबत शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सुचनानुसार ७२तासांच्या आत विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवील्या आहेत.त्यानुसार 25%पेक्षा जास्त क्षेत्र बाधीत असल्याने रॅडम (randam)पध्दतीविमा प्रतिनीधी व कृषी विभागाव्दारे संयुक्तरीत्या पंचनामे करण्यात आले होते.त्या नुसार महसुल मंडळ निहाय व पीकनिहाय केलेल्या पंचनाम्यानुसार टक्केवारी पिक विमा नुकसान भरपाई निश्चित करतांना ग्राह्य धरणे आवशक होते.परंतु विमा कंपनीने पंचनामे नुसार टक्केवारी न घेता कमी टक्केवारी घेऊन कमी रक्कम मंजुर केली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमी पिक विमा मिळाल्याने व अनेकांना पिक विमा योजनेपासुन वंचीत ठेवल्याची बाब 

हेरुण स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांसह चिखली कृषी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले होते.या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला होता.परंतु पाच दिवस उलटुनही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने स्वाभिमानी चे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनात सहभागी होत मुंडन आंदोलन करीत आक्रमक पावित्रा घेतल्याने जिल्ह्यातील५०००शेतकरी व तालुक्यातील १३८८ शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यात आली होती.तर इतर मागण्यांची व उर्वरीत तक्रारींचा निपटारा १०दिवसात करु असे अश्वासन देखील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आंदोलनकर्ते यांना दिले होते.परंतु आजही अनेक शेतकऱ्यांच्या पिक विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने व तालुक्यातील 8860 शेतकऱ्यांचा एकुन 86023574.95रु ची पिक विमा रक्कम कमी मिळाल्याचा महसुल मंडळ निहाय सविस्तर अहवाल कंपनीस कृषी विभागाकडुन पाठवला असतांना सुद्धा तफावत रक्कम देण्यात आली नसल्याने व दिलेल्या अश्वासनाची पुर्तता होत नसल्याने 

 व कृषी विभागाकडुन विमा कंपनीस सविस्तर पत्र व्यवहार होऊन देखील कृषी विभागास जुमानत नसल्याने व कृषी विभाग यांच्या पत्रांना व अहवालास केराची टोपली विमा कंपनीकडुन दाखवली जात असल्याने दि०१/०२/२०२२

रोजी दिलेल्या मंडळ निहाय तफावत अहवालानुसार पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी,तक्रारकर्ते वंचीत शेतकरी यांची विमा रक्कम अदा करण्यात यावी,कमी रक्कम देत शेतकरी यांची फसवणुक केल्या प्रकरणी व दि दिलेल्या अश्वासनातील मुद्दा क्र६नुसार पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा,यासह विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन करण्यात आल्या असुन या मागण्यांची पुर्तता चार ते आठ दिवसात करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडु असा इशारा शेतकर्यासह सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिला आहे.यावेळी विनायक सरनाईक, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे, पंजाब हाडे,भारत गाढवे,गुलाबराव शिंदे, बद्रीनाथ चिकणे,कैलास भुतेकर, नारायण करवंदे,भिमराव ढवळे,विष्णु आदमाने,प्रभाकर हावरे यांच्यासह आदि शेतकरी उपस्थीत होते.

English Summary: Pay the crop insurance amount of the difference as per the report sent to the insurance company wise by the revenue board.
Published on: 17 February 2022, 06:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)